Father of India’s Green Revolution MS Swaminathan Passes Away: १९६० च्या दशकात भारतात आलेल्या हरित क्रांतीचे जनक मानले गेलेले ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ व सुप्रसिद्ध वैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन यांचं गुरुवारी निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. देशातील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी तांदळाच्या विविध प्रकारच्या उच्च उत्पादन देणाऱ्या प्रजाती तयार करण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या नोकरीच्या काळात त्यांनी प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला होता. २००४ साली स्वामीनाथन यांना राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही नियुक्त करण्यात आलं होतं.

स्वामीनाथन यांची कारकिर्द

एम. एस. स्वामीनाथन यांनी १९६१ ते १९७२ या ११ वर्षांच्या काळात भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक म्हणून काम पाहिलं. १९७२ ते १९७९ या काळात ते आयसीएआरचे महासंचालक आणि केंद्रीय कृषीय विभागाचे सचिव म्हणून काम पाहात होते. पुढच्याच वर्षी त्यांची कृषी खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. १९८० ते ८२ या तीन वर्षांत त्यांनी नियोजन आयोगाचे उपसंचालक आणि त्यानंतर सदस्य म्हणून कार्यभार सांभाळला. १९८२ ते ८८ या ७ वर्षांत त्यांनी इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्युटचे महासंचालक म्हणूनही काम केलं.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Supriya Sule on GOd
Supriya Sule : नवरात्रीचे नऊ दिवस उपवास अन् पांडुरंगावर भाबडं प्रेम; सुप्रिया सुळे श्रद्धेविषयी काय म्हणाल्या?
Yoga Guru Sharath Jois
Yoga Guru Sharath Jois : मॅडोनाचे योग गुरू शरथ जोइस यांचं ट्रेकिंग करताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
Golden fox dead in Kharghar, Golden fox, Kharghar,
खारघरमध्ये सुवर्ण कोल्हा मृतावस्थेत

शेतकरी आत्महत्या व राष्ट्रीय शेतकरी आयोग

२००४ साली वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या अध्यक्षपदी स्वामीनाथन यांची नियुक्त करण्यात आली. स्वामीनाथन आयोगानं २००६ साली त्यांचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर केला. या अहवालात, शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी मिळणारा हमीभाव हा मालाच्या उत्पादनाच्या खर्चाच्या किमान दुप्पट असावा अशी शिफारस स्वामीनाथन आयोगाने केली होती.

करुणामयी विज्ञानाचार्य…एम. एस. स्वामीनाथन!

पहिला जागतिक अन्न पुरस्कार!

एम. एस. स्वामीनाथन यांचा १९८७ साली पहिल्या विश्व अन्न पुरस्काराने (World Food Prize) सन्मान करण्यात आला. यानंतर स्वामीनाथन यांनी चेन्नईमध्ये एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनची स्थापनाही केली.

एम. एस. स्वामीनाथन यांना पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्याशिवाय एच. के. फिरोदिया पुरस्कार, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.याव्यतिरिक्त त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार (१९७१) व अल्बर्ट आईनस्टाईन वर्ल्ड सायन्स अवॉर्ड (१९८६) हे दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मानाचे पुरस्कारही मिळाले होते.