R. Chidambaram Death : भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमात निर्णायक भूमिका बजावणारे भौतिकशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे शनिवारी वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. अणुऊर्जा विभागाने (DAE) दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

“हे जाहीर करताना आम्हाला दु:ख होत आहे की, प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ आणि भारतातील सर्वात प्रतिष्ठित शास्त्रज्ञांपैकी एक असलेले डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे आज (४ जानेवारी २०२५) पहाटे ३.२० वाजता निधन झाले. डॉ. चिदंबरम यांचे भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचे दूरदर्शी नेतृत्व कायम स्मरणात राहील,” असे डीएईने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Image of Supreme Court
ED : “हे अमानवी वर्तन…”, माजी काँग्रेस आमदाराची अटक सर्वोच्च न्यायालयाने ठरवली बेकायदेशीर; ईडीला फटकारले
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Mukesh Chandrakar Murder Case.
Mukesh Chandrakar : पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येतील आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई, छत्तीसगड सरकारचा आक्रमक पवित्रा
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Scottish hiker detained in New Delhi over use of Garmin inReach
तुमच्याकडे ‘हे’ जीपीएस आढळल्यास होऊ शकते अटक; यावर भारतात बंदी का? स्कॉटिश महिलेला का झाली अटक?
Election Commission, maharashtra Director General of Police, Rashmi Shukla
विश्लेषण : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना अखेर निवडणूक आयोगाने का हटविले?
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?

डॉ. राजगोपाल चिदंबरम यांनी १९७४ मध्ये भारताच्या पोखरणमधील पहिल्या आणि १९९८ मध्ये दुसऱ्या अण्वस्त्र चाचणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून अनेक प्रतिष्ठित पदांवर काम केले आहे.

पंतप्रधान मोदींकडून आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. राजगोपाल चिदंबरम यांच्या निधनानंतर, त्यांना आदरांजली वाहताना म्हटले की,” डॉ. राजगोपाल चिदंबरम यांच्या निधनाने खूप दुःख झाले. ते भारताच्या आण्विक कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पकार होते आणि त्यांनी भारताच्या वैज्ञानिक आणि सामरिक क्षमतांना बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.”

हे ही वाचा : Cyber Fraud: अमेरिकेतील मॉडेल असल्याचे भासवून ७०० महिलांची डेटिंग ॲपवरून फसवणूक; दिवसा नोकरी, रात्री भुरटेगिरी, असा पकडला आरोपी

पुरस्कार

१९३६ मध्ये जन्मलेले डॉ. चिदंबरम चेन्नईतील प्रेसिडेन्सी कॉलेज आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरूचे माजी विद्यार्थी होते. डॉ. चिदंबरम यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल १९७५ मध्ये पद्मश्री आणि १९९९ मध्ये पद्मविभूषण, तसेच अनेक विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेटसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

हे ही वाचा : Mukesh Chandrakar: भ्रष्टाचार उघड केल्यानंतर पत्रकाराची हत्या; नक्षलवादाचे निर्भय वार्तांकन करणाऱ्या मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह आढळला

अनेक प्रतिष्ठित पदांवर काम

डॉ. चिदंबरम यांनी त्यांच्या कारकिर्दीत भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार (२००१-२०१८), भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक (१९९०-१९९३), अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष (१९९३-२०००) अशा अनेक प्रतिष्ठित पदांवर काम केले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांनी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष (१९९४-१९९५) म्हणूनही काम केले आहे.

Story img Loader