प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांना या वर्षीचा ‘पेन पिंटर २०२४’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्रतिष्ठेचा मानला जातो. ‘पेन पिंटर हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अरुंधती रॉय यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, युनायटेड किंगडम, रिपब्लिक ऑफ आयर्लंड किंवा कॉमनवेल्थमध्ये राहणाऱ्या उत्कृष्ट साहित्यिक गुणवत्तेच्या लेखकाला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.

नाटककार हॅरॉल्ड पिंटर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. नाटककार हॅरॉल्ड पिंटर यांच्या स्मरणार्थ २००९ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. या वर्षीचा ‘पेन पिंटर पुरस्कार २०२४’ हा पुरस्कार प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांना जाहीर झाल्यानंतर आता १० ऑक्टोबर रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी अरुंधती रॉय मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : “भारत हिंदू राष्ट्र नाही”, नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निवडणूक विश्लेषण!

हा पुरस्कार युनायटेड किंगडम, आयर्लंड किंवा कॉमनवेल्थमधील लेखकांना देण्यात येतो. लेखकांचे साहित्य क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन या पुरस्काराने गौरवण्यात येते. रुथ बॉर्थिक, खालिद अब्दलाल आणि रॉजर रॉबिन्सन या तिघांच्या समितीने अरुंधती रॉय यांच्या नावाची या वर्षीच्या या पुरस्कारासाठी शिफारस केली होती.

दरम्यान, “अरुंधती रॉय यांचा प्रभावी आवाज कधीच शांत करता आला नाही. आपले जीवन, आपला समाज यांचे सत्य यांची व्याख्या करणाऱ्या त्या आक्रमक विचारवंत आहेत, असं या पुरस्कार निवडीतील ज्युरींनी म्हटलं आहे. रुथ बॉर्थिक म्हणाले की, “पेन पिंटर पारितोषिक २०२४ जिंकल्याबद्दल अरुंधती रॉय यांचे आमचे अभिनंदन. अरुंधती रॉय अन्यायाच्या तातडीच्या कथा सांगतात. त्या खऱ्या अर्थाने एक आंतरराष्ट्रीय विचारवंत आहेत. त्यांचा हा ताकदवान आवाज बंद केला जाऊ शकत नाही”, असं थ बॉर्थिक यांनी म्हटलं.