लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षातील पदांचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दबाव असल्याच्या वृत्ताचे पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी मंगळवारी खंडन केले. यासंदर्भात काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असल्याचे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.
राजनाथसिंह म्हणाले, काही वृत्तवाहिन्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या संपूर्ण घडामोडींवर भाष्य केल्याचे वृत्त दाखविण्यात येते आहे. मात्र, मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की संघाने यासंदर्भात काहीही म्हटलेले नाही. संघातील काही लोकांकडे मी विचारणा केली. पण या प्रकरणावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याचे त्यांनी मला सांगितले.
राजनाथसिंह यांनी दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानातून बाहेर पडताना पत्रकारांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली. अडवाणी यांनी भाजपमधील पदांचा राजीनामा दिल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी फोनवरून राजनाथसिंह यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दाखवले होते. त्याचबरोबर कोणत्याही स्थितीत नरेंद्र मोदी यांची प्रचारप्रमुख म्हणून झालेली निवड रद्द करायची नाही, यावर संघ आणि भाजपमधील नेते ठाम असल्याचे वृत्तही काम माध्यमांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
भाजप संघाच्या दबावाखाली असल्याचे वृत्त निराधार – राजनाथसिंह
लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षातील पदांचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दबाव असल्याच्या वृत्ताचे पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी मंगळवारी खंडन केले.
First published on: 11-06-2013 at 01:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reports on sanghs role not correct says rajnath as advani remains adamant