Republic Day Parade 2022: आज संपूर्ण देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भारताचं स्वातंत्र्याचं ७५ वं वर्ष असल्याने हा प्रजासत्ताक दिन विशेष आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील प्रजासत्ताक दिन आठवडाभर म्हणजेच २३ जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंत साजरा केला जाणार आहे. २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती होती, तर ३० जानेवारीला शहीद दिवस आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी उपस्थित राहणाऱ्यांसाठी दिल्ली पोलिसांकडून नियमावली जाहीर करण्यात आली होती. लसीकरण यावेळी अनिवार्य होतं. तसंच १५ पेक्षा लहान वयाच्या मुलांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. संचलनात जवळपास १२ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे २१ चित्ररथ सहभागी झाले. यावेळी तिन्ही सैन्यदलांनी आपल्या शक्ती आणि सामर्थ्याचं प्रदर्शन केलं. तसंच ४८० कलाकारांनी ‘वंदे भारतम’ या संकल्पेंतर्गत नृत्याविष्कार सादर करत भारताच्या संस्कृतीचं दर्शन केलं.

Live Updates
08:13 (IST) 26 Jan 2022
दिल्लीत तयारी सुरु

दिल्लीत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी तयारी सुरु झाली आहे.

08:11 (IST) 26 Jan 2022
पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून देशवासियांना ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

08:10 (IST) 26 Jan 2022
विजय चौकात ड्रोन्सची रंगीत तालीम

‘Beating the Retreat’ कार्यक्रमासाठी भारतात निर्मिती करण्यात आलेले १००० ड्रोन कार्यक्रमाचा भाग असणार आहे. पूर्वसंध्येला विजय चौकात या ड्रोन्सच्या सहाय्याने आकाश वेगवेगळे आकार तयार करत प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं.

08:06 (IST) 26 Jan 2022
भारत-पाकिस्तान सीमेवर ‘हाय अलर्ट’

प्रजासत्ताक दिनापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय सीमेपासून नियंत्रण रेषेपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्वच जिल्ह्यात पोलिस अनेक ठिकाणी वाहने व संशयितांची चौकशी करत आहेत. दुसरीकडे, धमकी देण्यात आल्याने भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना प्रजासत्ताक दिनी हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. (वाचा पूर्ण बातमी)

08:04 (IST) 26 Jan 2022
प्रजासत्ताक दिनी पाहायला मिळणार सर्वात मोठा फ्लायपास्ट

इतिहासात प्रथमच या परेडमध्ये ७५ विमानांचा फ्लाय पास्ट होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की ७५ विमानांचे भव्य फ्लाय-पास्ट सांस्कृतिक प्रदर्शन होणार आहे. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ७५ मीटर लांबीच्या १० स्क्रोलचे (सांस्कृतिक नृत्य) प्रदर्शन यासारखे कार्यक्रम होणार आहेत. (वाचा पूर्ण बातमी)

08:03 (IST) 26 Jan 2022
लडाख सीमेवरही ITBP जवानांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन

लडाख सीमेवरही इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP) जवानांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन

08:01 (IST) 26 Jan 2022
इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी हाडं गोठवणाऱ्या थंडीत फडकवला तिरंगा

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी (ITBP) उत्तराखंडमध्ये १४ हजार फुटांवर हाडं गोठवणाऱ्या थंडीत उणे ३० अंश सेल्सियस तापमानात तिंरगा फडकावला.

07:49 (IST) 26 Jan 2022
गुगलचं विशेष डुडल

गुगलने प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष डुडल ठेवलं आहे. यामधून भारतीय संगीत संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

07:46 (IST) 26 Jan 2022
दिल्ली पोलिसांची कडक सुरक्षाव्यवस्था

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून कडक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. मिंट रोडवर पोलीस कर्मचारी वाहनांची तपासणी करत असताना

07:45 (IST) 26 Jan 2022
नेपाळकडून भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

नेपाळचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याकडून भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

07:43 (IST) 26 Jan 2022
राज्यातील ५१ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदके जाहीर

प्रजासत्ताक दिनानिमित्त  राज्यातील ५१ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती व पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, तर सात जणांना ‘पोलीस शौर्य पदक’, तसेच प्रशंसनीय सेवेकरिता ४० जणांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहे.

देशभरातील पोलिसांनी गाजविलेल्या शौऱ्याबद्दल केंद्रीय गृह विभागातर्फे दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पोलीस पदक’ जाहीर करण्यात येते. यावर्षी एकूण ९३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली असून ८८  पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदकह्ण (पीपीएम), १८९ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी), ६६२ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) आणि दोन जणांना ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाले आहे. यामध्ये महाराष्ट्राला एकूण ५१ पदके मिळाली आहेत. (वाचा पूर्ण बातमी)

07:42 (IST) 26 Jan 2022
राज्यातील दहा जणांना पद्म पुरस्कार

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने १२८ पद्म पुरस्कारांची घोषणा केली़  त्यात राज्यातील दहा जणांचा समावेश आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘टाटा’सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन आणि ‘पूनावाला उद्योग समूहा’चे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील एकाला पद्मविभूषण, दोघांना पद्मभूषण तर सात जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापैकी डॉ. बालाजी तांबे यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे. (वाचा पूर्ण बातमी)

07:40 (IST) 26 Jan 2022
लष्करात महिलांचा वाढता सहभाग

देशाच्या संरक्षण दलाचे तत्कालीन प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूबद्दल राष्ट्रपती कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले व रावत यांना आदरांजली वाहिली. देशभक्ती नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना बळकट करते. तुम्ही डॉक्टर असो वा वकील, दुकानदार असो वा कार्यालयीन कर्मचारी, सफाई कर्मचारी असो वा मजूर असो, आपले कर्तव्य चोखपणे आणि कार्यक्षमतेने करणे हेच योगदान असते, असे ते म्हणाले. सशस्त्र दलांमध्ये महिलांचा सहभाग वाढत असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल आहे, असेही कोविंद म्हणाले.  

07:40 (IST) 26 Jan 2022
गावाची-देशाची सेवा करा!

गेल्या वर्षी मी कानपूर जिल्ह्यातील पारौंख या मूळगावी गेलो होतो. माझ्या गावाच्या आशीर्वादामुळे मी राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचू शकलो. मी जगात कुठेही असलो तरी माझे गाव आणि माझा देश माझ्या हृदयात राहतो. आपल्या कठोर परिश्रम आणि प्रतिभेमुळे यशस्वी होतात, त्यांनी आपले मूळ, आपले गाव-शहर विसरू नये. आपल्या गावाची, आपल्या देशाची जमेल त्या मार्गाने सेवा करावी, अशी सूचना कोिवद यांनी केली. नौदल व कोचीन शिपयार्ड यांनी स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक विमानवाहू युद्धनौका ‘’आयएसी विक्रांत’’ तयार केली. अशा आधुनिक लष्करी क्षमतेमुळे भारताची गणना आता जगातील आघाडीच्या नौदलसमर्थ देशांमध्ये झाली आहे. हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील नागरिकांनी ‘स्व-प्रेरित आदर्श ग्राम योजने’ अंतर्गत गावाचा कायापालट केल्याचेही पाहिले. ही स्वावलंबी उदाहरणे अनुकरणीय असल्याचे कोविंद म्हणाले.

07:40 (IST) 26 Jan 2022
अतुलनीय धैर्य..

राष्ट्रीय सेवेचे मूलभूत कर्तव्य पार पाडत कोटय़वधी लोकांनी स्वच्छ भारत मोहीम आणि करोना लसीकरण मोहिमेचे जनचळवळीत रूपांतर केले. अशा मोहिमा यशस्वी होण्याचे श्रेय कर्तव्यदक्ष नागरिकांना जाते, असेही कोिवद म्हणाले. लोकसंख्येच्या घनतेमुळे भारतात साथीच्या रोगाचे नियंत्रण अधिक कठीण होते. आपल्याकडे पुरेशी साधनसंपत्ती व पायाभूत सुविधा नाहीत. तरीही कोरोनाविरोधात अतुलनीय धैर्य दाखवत आपण आरोग्यसेवेतील पायाभूत सुविधांचा विकास केला. स्वदेशी लस विकसित केल्या. इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली. अन्य देशांनाही लस आणि इतर वैद्यकीय मदत देत आहोत. भारताच्या या योगदानाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक केले जात आहे, असे उद्गार कोविंद यांनी काढले.

07:39 (IST) 26 Jan 2022
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी साधला देशवासियांसोबत संवाद

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी देशाला उद्देशून केलेलं भाषण