Republic Day Parade 2022: आज संपूर्ण देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भारताचं स्वातंत्र्याचं ७५ वं वर्ष असल्याने हा प्रजासत्ताक दिन विशेष आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील प्रजासत्ताक दिन आठवडाभर म्हणजेच २३ जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंत साजरा केला जाणार आहे. २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती होती, तर ३० जानेवारीला शहीद दिवस आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी उपस्थित राहणाऱ्यांसाठी दिल्ली पोलिसांकडून नियमावली जाहीर करण्यात आली होती. लसीकरण यावेळी अनिवार्य होतं. तसंच १५ पेक्षा लहान वयाच्या मुलांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. संचलनात जवळपास १२ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे २१ चित्ररथ सहभागी झाले. यावेळी तिन्ही सैन्यदलांनी आपल्या शक्ती आणि सामर्थ्याचं प्रदर्शन केलं. तसंच ४८० कलाकारांनी ‘वंदे भारतम’ या संकल्पेंतर्गत नृत्याविष्कार सादर करत भारताच्या संस्कृतीचं दर्शन केलं.

Live Updates
13:16 (IST) 26 Jan 2022
Republic Day 2022: राष्ट्रपतींचा अंगरक्षक ‘विराट’ निवृत्त

१५ जानेवारीला आर्मी डेच्या पूर्वसंध्येला विराटला आर्मी स्टाफचे चीफ कमंडेशन देण्यात आले होते. वाचा सविस्तर…

12:30 (IST) 26 Jan 2022
१०० तिरंगा फुगे हवेत सोडण्यात आले

कार्यक्रमाची सांगता करताना १०० तिरंगा फुगे हवेत सोडण्यात आले.

12:20 (IST) 26 Jan 2022
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सांगता

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली आहे. यानंतर राजपथावरुन निघत असताना पंतप्रधान, राष्ट्रपती यांनी राष्ट्रपती यांच्या गार्ड्समध्ये असलेल्या अश्वाला गोंजारले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद राजपथावरुन निघाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित नागरिकांना हात दाखवत अभिवादन केलं.

12:12 (IST) 26 Jan 2022
प्रजासत्ताक दिनी पाहायला मिळाला सर्वात मोठा फ्लायपास्ट

इतिहासात प्रथमच या परेडमध्ये ७५ विमानांचा फ्लाय पास्ट पार पडला.

12:05 (IST) 26 Jan 2022
अंगावर शहारा आणणारे दृष्य

राजपथावर भारतीय हवाई दलाने हवेत केलेल्या साहसी प्रात्यक्षिकाचं हे दृष्य पाहून अंगावर शहारा येईल

12:01 (IST) 26 Jan 2022
सीमा भवानी यांचं साहसी प्रात्यक्षिक

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) सीमा भवानी यांच्या पथकाने दुचाकीवर साहसी प्रात्यक्षिकं दाखवत 'बेटी बचाओ, बेटी पढाओचा' संदेश दिला.

11:53 (IST) 26 Jan 2022
पंजाबचा चित्ररथ

'स्वातंत्र्य लढ्यात पंजाबचे योगदान' दर्शवणारा पंजाबचा चित्ररथ संचलनात सहभागी झाला. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचं बलिदानही यावेळी दाखवण्यात आलं. तसंच लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखालील सायमन कमिशनविरोधातील निषेध आणि मायकल ओडवायर यांच्यावर उधम सिंग यांनी केलेल्या हल्ल्याचंही चित्रण आहे.

11:51 (IST) 26 Jan 2022
४८० कलाकारांचा नृत्याविष्कार

'वंदे भारतम' या संकल्पेंतर्गत ४८० कलाकारांनी नृत्याविष्कार सादर करण्यात आला. यावेळी भारताच्या संस्कृतीचं दर्शन करण्यात आलं.

11:45 (IST) 26 Jan 2022
महाराष्ट्राच्या चित्ररथात साताऱ्यातील ‘कास’ पठार

संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी झाला. या चित्ररथावर सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुले व प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला. कास पठाराचा चित्ररथात समावेश झाल्याने सातार्‍यासाठी ही बाब भूषणावह ठरली आहे.

महाराष्ट्राच्या चित्ररथावर पाच “जैवविविधता मानकं” आहेत, ज्यात राज्यासाठी अद्वितीय असलेल्या वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश आहे. सुमारे 15 प्राणी आणि 22 वनस्पती आणि फुले या चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आली.

11:42 (IST) 26 Jan 2022
मेघालयचा चित्ररथ

मेघालयच्या चित्ररथात एक महिला बांबूची टोपली विणत आहे. तसंच राज्यातील बांबू आणि ऊस उत्पादने दाखवण्यात आली आहे.

11:40 (IST) 26 Jan 2022
महाराष्ट्राचा चित्ररथातून झाडे जगवण्याचा संदेश

राजपथावर अमिताभ झाले महाराष्ट्राचा आवाज; चित्ररथासाठी मराठीत घातली पर्यावरण वाचवण्याची साद

11:35 (IST) 26 Jan 2022
सीमा सुरक्षा दलाचा उंटावर बसलेला बँड

राजपथ येथे ७३ व्या प्रजासत्ताक दिनी सीमा सुरक्षा दलाचा बँड सहभागी झाला होता. हे जवान उंटावर बसलेले होते.

11:33 (IST) 26 Jan 2022
भारतीय वायुसेनेचा चित्ररथ

'भारतीय वायुसेनेचे भविष्यासाठी परिवर्तन' या संकल्पनेवर आधारित भारतीय वायुसेनेचा चित्ररथ संचलनात सहभागी झाला होता. यात MiG-21, Gnat, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH), अस्लेशा रडार आणि राफेल विमानांचे स्केल-डाउन मॉडेल्स दाखवण्यात आले.

11:19 (IST) 26 Jan 2022
भारतीय नौदलाचा चित्ररथ

नौदलाच्या क्षमतांचं प्रदर्शन तसंच 'आत्मनिर्भर भारत' अंतर्गत प्रमुख गोष्टी ठळकपणे दाखविण्याच्या उद्देशाने हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. 'आझादी का अमृत महोत्सव'चाही विशेष उल्लेख यावेळी करण्यात आला आहे.

11:05 (IST) 26 Jan 2022
पॅराशूट रेजिमेंट भारतीय सैन्याच्या नवीन लढाऊ गणवेशात

पॅराशूट रेजिमेंट भारतीय सैन्याच्या नवीन लढाऊ गणवेशात सहभागी झाली.

11:04 (IST) 26 Jan 2022
शीख लाइट इन्फंट्री तुकडी राजपथ येथील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी

शीख लाइट इन्फंट्री तुकडी राजपथ येथील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाली. लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे हे रेजिमेंटचे सध्याचे कर्नल आहेत.

10:48 (IST) 26 Jan 2022
लोकसत्तावर पाहू शकता संपूर्ण सोहळा

दिल्लीमधील राजपथावर सुरु असलेला प्रजासत्ताक दिन सोहळा तुम्ही लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलवर पण पाहू शकता.

10:46 (IST) 26 Jan 2022
सहाय्यक उपनिरीक्षक बाबू राम यांना मरणोत्तर अशोकचक्र प्रदान

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये जम्मू-काश्मीर पोलीस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक बाबू राम यांना मरणोत्तर अशोकचक्र प्रदान करण्यात आले.

10:39 (IST) 26 Jan 2022
Mi-17V5 हेलिकॉप्टरची उड्डाणं

155 हेलिकॉप्टर युनिटच्या चार Mi-17V5 हेलिकॉप्टर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये उड्डाण केलं

10:28 (IST) 26 Jan 2022
राष्ट्रपती रामनाथ कोविंद राजपथावर दाखल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी राजपथावर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात संचलनाला सुरुवात होईल.

10:16 (IST) 26 Jan 2022
अटारी बॉर्डरवर भारत-पाकिस्तानच्या जवानांकडून मिठाई वाटप

अटारी-वाघा बॉर्डरवर भारत आणि पाकिस्तानच्या जवानांनी एकमेकांना मिठाई दिली.

10:10 (IST) 26 Jan 2022
मोदींकडून राष्ट्रीय युद्ध स्मारकावर अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहिदांना अभिवादन केलं. यावेळी तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते.

09:59 (IST) 26 Jan 2022
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या हस्ते ध्वजारोहण

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कात उपस्थिती लावली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

09:45 (IST) 26 Jan 2022
पुण्यातील परेड रद्द

गर्दी असल्याने पुण्यातील परेड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. करोनामुळे साधेपणाने कार्यक्रम साजरा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

09:25 (IST) 26 Jan 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवार्जी पार्कमध्ये दाखल

प्रकृतीच्या कारणास्तव गेल्या काही दिवसांपासून 'वर्क फ्रॉम होम' करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल झाले आहेत. शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले आहेत.

09:18 (IST) 26 Jan 2022
अमर जवान ज्योतीचा फोटो शेअर करत राहुल गांधींनी दिल्या शुभेच्छा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमर जवान ज्योतीचा फोटो शेअर करत देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. “१९५० मध्ये प्रजासत्ताक दिनी आपल्या देशाने विश्वासाने योग्य दिशेने पहिलं पाऊल टाकलं होतं. सत्य आणि समानतेच्या त्या पहिला पावलासाठी नमन,” असं राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

09:10 (IST) 26 Jan 2022
नागपुरात संघ मुख्यालयात ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनी नागपुरात संघ मुख्यालयात महानगर संघचालक राजेश लोया यांनी ध्वजारोहण केलं. यावेळी प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण सोहळ्यामध्ये मोहिते शाखेतील स्वयंसेवक आणि सुरक्षेसाठी तैनात जवानांनी सहभाग घेतला होता. ध्वजारोहणानंतर नागपूर संघचालक राजेश लोया यांनी जवानांशी प्रवासातला संपूर्ण देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

08:52 (IST) 26 Jan 2022
भाजपाच्या दिल्लीमधील मुख्यालयात ध्वजारोहण

भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते भाजपाच्या दिल्लीमधील मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं.

08:46 (IST) 26 Jan 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

08:29 (IST) 26 Jan 2022
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिन निमित्ताने वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या.