74th Republic Day 2023 Parade : आज आपला भारत देश ७४वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यानिमित्त गावखेड्यापासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राजधानी दिल्लीत पथसंचलन होणार आणि पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त शिवसेनेने (ठाकरे गट) मोदी सरकारला उद्देशून काही प्रश्न विचारले आहेत.

नक्का पाहा – PHOTOS : प्रजासत्ताकदिनी ‘कर्तव्य’पथावरील आकर्षक चित्ररथांद्वारे घडलं देशातील नारीशक्ती, पर्यटन आणि संस्कृतीचं अनोखं दर्शन!

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या... (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? संजय शिरसाट यांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले…
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

“एकीकडे हिंदुस्थानातील तरुण वर्ग बेरोजगारीने ग्रासलेला आहे. नोकऱ्यांसाठी वणवण भटकतो आहे, शेतीचा खर्च आणि शेतमालाचा भाव यांचा कुठेच मेळ बसत नसल्याने शेतकरी आत्महत्या करतो आहे आणि दुसरीकडे अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये मात्र दररोज साडेतीन हजार कोटी रुपयांची वाढ होत आहे. राज्यघटना स्वीकारली तो दिवस म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. त्या घटनेप्रमाणेच हा देश चालेल, असा शब्द देऊन आपण राज्यघटना स्वीकारली, पण आज देशात घटनेप्रमाणे एखादे तरी काम सुरू आहे काय? घटनेने न्यायपालिका, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक वगैरे संस्थांना दिलेली स्वायत्तता विद्यमान सरकारला मान्य नाही. सगळीकडे ताटाखालचीच मांजरे हवीत आणि सरकारी हुकमांना ‘होयबा’ म्हणणारे लोक हवेत, अशी हुकूमशाही मानसिकता असणाऱ्या लोकांच्या हाती आज देशाचे प्रजासत्ताक सापडले आहे. घटनाविरोधी कारवाया करून विरोधी पक्षांची सरकारे उलथविली जातात, घटनाबाहय़ सरकारे आणली जातात. पक्षपाती निर्णय घेऊन एका राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळवले जातात. या दडपशाहीलाच प्रजासत्ताक म्हणावे काय?” असं सामनाच्या अग्रलेखाद्वारे म्हटलं आहे.

Republic Day 2023 Live: जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकांनी काढली ‘तिरंगा रॅली’!

मूठभरांसाठी काम करणारी सत्ता उलथवून खरेखुरे जनतेचे राज्य यावे यासाठी… –

याचबरोबर “निवडक लोक तुपाशी आणि बहुसंख्य जनता उपाशी, असे भेसूर चित्र ७४ व्या प्रजासत्ताक दिनी दिसत असले तरी भविष्यात बदल घडवावाच लागेल. मूठभरांसाठी काम करणारी सत्ता उलथवून खरेखुरे जनतेचे राज्य यावे यासाठी देशातील प्रजेलाच आता एकजूट दाखवावी लागेल. घटनाकारांना अपेक्षित असलेला प्रजासत्ताक दिन ‘चिरायू’ ठेवायचा असेल तर मूठभरांची सत्ता जावो आणि प्रजेची सत्ता येवो, हे विद्यमान राज्यकर्त्यांना ठणकावून सांगावेच लागेल!” असंही म्हटलं आहे.

लोकसत्ता विश्लेषण: तिरंगा फडकवण्याची पद्धत, जागा आणि बरंच काही! १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीमध्ये काय फरक आहे?

सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत का? –

“देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र साजरा होईल. शाळा, सरकारी कार्यालये इत्यादी ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा उत्साह जरूर ओसंडून वगैरे वाहताना दिसेल, पण ज्या कारणासाठी हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो, त्या सामान्य प्रजेला, शेतकऱ्यांना, गोरगरीब शेतमजुरांना, कामगार-कष्टकऱ्यांना, बेरोजगार तरुणांना ही प्रजेची सत्ता आहे, असे खरोखरच वाटते आहे काय? प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ाचा आनंद गाव, खेडी, तांडे, वस्त्यांवरील गोरगरीब जनतेच्या चेहऱ्यावर दिसतो आहे का? हिंदुस्थान हे लोकशाही राष्ट्र आहे आणि इथे प्रजेची सत्ता आहे, असा शब्द देशातील जनतेला देउन आजच्याच दिवशी म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी आपण राज्यघटना स्वीकारली. तेव्हापासून आजतागायत आपण ७३ प्रजासत्ताक दिन साजरे केले. दरवर्षी महामहिम राष्ट्रपती महोदय दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकवून देशाला उद्देशून भाषण करतात. ‘रिपब्लिक डे’ परेड होते, विविध राज्यांचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे चित्ररथ दौडतात, लष्करी जवानांचे चित्तथरारक स्टंट पाहायला मिळतात. हे सगळे सोहळे आपण वर्षानुवर्षे पाहत आहोत. सालाबादप्रमाणे आजच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनीदेखील राष्ट्रपतींचे लाल किल्ल्यावरील भाषण आणि इतर सरकारी सोपस्कार पार पडतील, पण ज्या जनतेचे हे प्रजासत्ताक आहे, त्या सर्वसामान्य जनतेचे जगण्या-मरण्याचे जे असंख्य प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे त्यातून मिळणार आहेत का?” असं विचारण्यात आलं आहे.

Story img Loader