India Republic Day Parade 2025 : भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी देश सज्ज झाला आहे. आज इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. कर्तव्य पथावरील संचलनात इंडोनेशियाचे मार्चिंग पथक आणि बँड पथकदेखील सहभागी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पहार अर्पण करत शहिदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सुरुवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पाहा, सोहळ्याचे थेट प्रक्षेपण:

कर्तव्यपथावर आज १६ राज्य, केंद्रशासित प्रदेश, तसेच केंद्र सरकारच्या १० मंत्रालयांनी आपले चित्ररथ सादर केले.

Live Updates

Republic Day 2025 Live Updates | प्रजासत्ताक दिन २०२५ लाईव्ह अपडेट

12:05 (IST) 26 Jan 2025

Republic Day 2025 Live News: या १६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी चित्ररथाचे संचलन सादर केले, पण महाराष्ट्र…

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात देशातील १६ राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या संस्कृती आणि वारशाचे दर्शन चित्ररथांमधून दिले.

गोवा

उत्तराखंड

हरियाणा

झारखंड

गुजरात

आंध्रप्रदेश

पंजाब

उत्तर प्रदेश

बिहार

मध्य प्रदेश

त्रिपुरा

कर्नाटक

पश्चिम बंगाल

चंदीगढ

दिल्ली

दादरा नगर हवेली आणि दमण-दीव

11:01 (IST) 26 Jan 2025

Republic Day 2025 Live News: इंडोनेशियन लष्कराचे संचलन

इंडोनेशियन राष्ट्रीय लष्करी दलाच्या वतीने कर्तव्यपथावर संचलन केले. यावेळी इंडोनेशियाच्या विविध लष्कर दलातील १९० अधिकारी, सैनिक उपस्थित होते.

10:47 (IST) 26 Jan 2025

Republic Day 2025 Live News: ३०० कलाकारांनी बहुढंगी अंदाजात सादर केले “सारे जहाँ से अच्छा…” गाणं

कर्तव्यपथावर संचलन सुरू होण्यापूर्वी भारतातील विविध भागातून आलेल्या ३०० कलाकारांनी पारंपरिक वाद्यांच्या साहाय्याने “सारे जहाँ से अच्छा…” हे गाणं सादर केलं.

10:34 (IST) 26 Jan 2025

Republic Day 2025 Live News: कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदींचे आगमन, थोड्याच वेळात परेडची सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर आदरांजली व्यक्त केल्यानंतर ते कर्तव्यपथावर आले. याठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे स्वागत केल्यानंतर संचलनाची सुरुवात झाली.

10:10 (IST) 26 Jan 2025

Republic Day 2025 Live: “स्वर्णिम भारत: वारसा आणि विकास” ही यंदाच्या वर्षीची चित्ररथांसाठी थीम

१६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारची १० मंत्रालयांकडून यावेळी चित्ररथांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. “स्वर्णिम भारत: वारसा आणि विकास” या विषयावर प्रकाश टाकणारी चित्ररथ यावेळी सादर केली जाणार आहेत.

09:08 (IST) 26 Jan 2025

Republic Day 2025 Live News: पंतप्रधान मोदींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपले संविधान निर्माण करून ज्यांनी हे सुनिश्चित केले की, आपली विकास यात्रा लोकशाही, प्रतिष्ठा आणि एकतेच्या मार्गावर असेल, त्या सर्वांना मी आज अभिवादन व्यक्त करतो. मला आशा आह की, हा राष्ट्रीय उत्सव संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करत एक सशक्त आणि समृद्ध भारत बनविण्याच्या दिशेने आमच्या प्रयत्नांना आणखी बळकट करेल.

09:02 (IST) 26 Jan 2025

Republic Day 2025: तिरंगी रंगात सजले पंढरीचे विठ्ठल मंदिर

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आज देशप्रेमाच्या तिरंगी रंगात सजले आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांच्या माध्यमातून मंदिरात तिरंगी रंगांच्या फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे तिरंगी रंगात विठ्ठलाचे रूप मनोहारी दिसत होते.

09:01 (IST) 26 Jan 2025

Republic Day 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.

08:06 (IST) 26 Jan 2025

Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी केलं ‘एक देश, एक निवडणूक’चे समर्थन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित केले. ‘एक देश, एक निवडणूक’ या धोरणामध्ये प्रशासनातील ताळमेळ वाढवून, धोरण लकवा रोखून, साधनसंपत्तीचा चुकीचा वापर कमी करून आणि राज्यांवरील आर्थिक भार कमी करून सुप्रशासनाची परिभाषा बदलण्याची क्षमता आहे, अशा शब्दांमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी या धोरणाचे समर्थन केले.

08:01 (IST) 26 Jan 2025

Republic Day 2025 Live: ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..

देशभरात मोठ्या उत्साहात आज प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. भारताची ताकद, सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन दिल्लीच्या कर्तव्यपथावरील परेडमधून होत असते. सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रध्वज फडकवून सोहळ्याची सुरुवात करतील. १०.३० वाजता ही परेड सुरू होईल.

(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांचे स्वागत केले.) (लोकसत्ता टीम)