राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त एकूण ९६७ जणांना पोलीस पदक जाहीर केले आहेत. त्यात २५ जणांना राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पुरस्कार तर १३२ जणांना पोलीस शौर्य पुरस्कार, ९८ जणांना विशिष्ट सेवा पुरस्कार, ७१२ जणांना चांगल्या सेवेसाठी पोलीस पदक दिले जात आहेत. महाराष्ट्रातील ६८ जणांना गौरवण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे गौतम गडमाडे-अमरावती, बळीराम जिवतोडे-नागपूर, सुरेश भोयर-गोंदिया, पंडित पवार-सिन्नर, शिवाजी धुरी-पुणे, दामोदर सिंग-नागपूर, कौशलधर दुबे-नागपूर, तुकाराम पाटील, माणिक तायडे-िहगोली, दिलीपकुमार भंडारे-मुंबई, भिकाजी राणे-मुंबई, दगडू अजिंठे-नंदूरबार, सच्चिदानंद राय-नागपूर, केशव मोरे-नागपूर, शिवाजी पाटील-नाशिक, विश्वनाथ पाटील-दादर, साहेबराव सूर्यवंशी-नाशिक, सुरेश इंगवले-पुणे, प्रवीण गुंदेचा-मुंबई, रमेश कोटे-नंदूरबार, रमेश खवले-नंदूरबार, सुरेश माने-दौंड, भगवान काकडे-जालना, जीवनकुमार कापुरे-पुणे, उल्हास गावकर-पुणे, बाळासाहेब जगदाळे-सातारा, जनार्दन राजूरकर-लातूर, केशव हजारे- दौंड, त्रिंबक घरत-पुणे, कमलाकार जाधव-पुणे, निशिकांत साळवी-मुंबई, रामचंद्र तापकीर-पुणे, दादासाहेब घुले-दौंड, सुरेश राऊत-दौंड यांचा त्यात समावेश आहे.
अहिरराव, पवार, संखे यांना जीवनरक्षा पुरस्कार
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी २०१४ या वर्षांसाठी ५६ व्यक्तींना जीवनरक्षा पुरस्कार जाहीर केले असून महाराष्ट्राचे शशिकांत रमेश पवार व गणेश अहिरराव यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे. भूषण शांताराम संखे यांनाही जीवनरक्षा पुरस्कार जाहीर झाला आहे.
नीरजकुमार सिंग यांना मरणोत्तर अशोकचक्र
शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार मानले जाणारे अशोक चक्र नाईक नीरज कुमार सिंग यांना मरणोत्तर जाहीर झाले आहे. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील अतिरेक्यांशी शौर्याने लढताना देशासाठी प्राणार्पण केले. कीर्ती चक्र हा दुसरा पुरस्कार तिघांना जाहीर झाला आहे, तर १२ जणांना शौर्यचक्र मिळाले आहे. त्यात लेफ्टनंट कर्नल संकल्पकुमार (मरणोत्तर) यांचा समावेश आहे. गेल्या डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर खोऱ्यात प्रचार सभा घेणार असताना झालेला अतिरेकी हल्ला परतवताना त्यांनी हौतात्म्य पत्करले होते. मेजर मुकुंद वरदराजन यांनाही मरणोत्तर अशोक चक्र जाहीर झाले आहे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा