पीटीआय, नवी दिल्ली
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भारताच्या या प्रतिष्ठित सोहळय़ासाठी उपस्थित राहणारे ते सहावे फ्रेंच नेते ठरतील. मात्र, या याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.भारताने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. परंतु काही कारणांमुळे त्यांनी भारत दौऱ्यावर येण्यास असमर्थता कळवली होती.
जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या प्रतिष्ठित ‘बॅस्टिल डे’ संचलनास सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. त्याच महिन्यात संरक्षण मंत्रालयाने फ्रान्सकडून २६ राफेल सागरी लढाऊ विमानांच्या खरेदीस मान्यता दिली होती.