दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. मात्र, यंदा परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता आहे. अंतिम निवडीसाठी १४ राज्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार अरविंद सावंत यांनी भाजपा आणि शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“वेदना होत आहेत, हे ऐकल्यानंतर. महाराष्ट्राचा चित्ररथ जेव्हा पथसंचलनालयात असतो, तेव्हा आमच्यासारखा शिवसैनिक तो पाहण्यासाठी उत्सुक असतो. महाराष्ट्राच्या रथाचे वैशिष्ट्य की, तो नेहमी देशात पहिला येतो. नौदल आणि सैन्यदलाचे चित्ररथ पाहताना प्रचंड उर्जा मिळते. त्यातच महाराष्ट्राचा रथ असल्याचा वेगळ अभिमान असतो,” असं अरविंद सावंत म्हणाले.

हेही वाचा : नाताळ, न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर परदेशातून भारतात येणाऱ्यांमुळे देशात करोना संसर्ग वाढण्याचा धोका?

“यंदा चित्ररथ नसल्याने महाराष्ट्राचे नाक कापलं गेलं. झोपलेत का हे सगळे जण. कसं सरकार चाललं आहे बगा. सत्तेशिवाय दुसरा कोणता विषय नाही. सांस्कृतिक आणि सामाजिक दृट्या भाजपा महाराष्ट्र प्रदूषित करत आहे. त्यातून महाराष्ट्राला सावरण्याची गरज आहे,” असेही अरविंद सावंत यांनी म्हटलं.

हेही वाचा : “सोनिया गांधींच्या दरबारातील कुत्रे…”, खरगेंवर टीका करताना भाजपा आमदाराची जीभ घसरली

२०२० मध्येही चित्ररथ नव्हता

प्रजासत्ताक दिनाला सादर करण्यात येणाऱ्या चित्ररथांच्या माध्यमातून राज्याची संस्कृती, विकास आणि कला दाखवली जाते. हे चित्ररथ मर्यादित संख्येत काढले जातात. यासाठी एक समिती काम करते. यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार आहे. यापूर्वी २०२२ मध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता. आता दोन वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राचा चित्ररथ नसल्याची माहिती समोर आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Republic day maharashtra chitrarath will not attend parade arvind sawant attacks bjp ssa