प्रजासत्ताक दिनाला राजपथावरील संचलनात सामील झालेल्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या संचलनात विविध राज्यांचे एकूण २५ चित्ररथ सहभागी झाले होते. या सगळ्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट ठरला. महाराष्ट्रानंतर झारखंडच्या चित्ररथाने दुसरा आणि कर्नाटकच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला. या चित्ररथाला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याने चित्ररथाचे दिग्दर्शक शेखर मोरे यांनी आनंद व्यक्त केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनात विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱया चित्ररथांचेही संचलन झाले. यंदा महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथातून वारकरी परंपरेचे दर्शन घडविण्यात आले होते. राज्याच्या संस्कृतीचा भाग असलेल्या वारकरी संप्रदायाचा इतिहास सांगणारा देखावा या चित्ररथावर साकारण्यात आला होता. विशेष म्हणजे, यासाठी सुप्रसिद्ध गायक-संगीतकार अजय-अतुल यांच्या बहुचर्चित माऊली…माऊली गाण्याचा वापर चित्ररथाचे पार्श्वसंगीत म्हणून करण्यात आला होता.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट
प्रजासत्ताक दिनाला राजपथावरील संचलनात सामील झालेल्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-01-2015 at 04:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Republic day maharashtra tableau get first prize