Shraddha Walkar murder by aaftab poonawalla case: वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकराने दिल्लीत निघ्रृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार हत्याकांडाच्या सहा महिन्यानंतर उघडकीस आला आहे. हत्या केल्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन ते तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगलातील वेगवेगळ्या भागांमध्ये विविध ठिकाणी फेकून देत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट श्रद्धाचा प्रियकर आफताब अमीन पूनावालाने रचला होता. २८ वर्षीय आफताब पूनावालाकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संबंधित तरुणीच्या शरीराचे काही तुकडे दिल्ली पोलिसांना सापडल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. आता या हत्याकांडासंदर्भात आणखीन धक्कादायक माहिती समोर येत असून श्रद्धाला तिच्या जिवाला धोका असल्याचा अंदाज पूर्वीच आला होता असं तिच्या मित्राने दिलेल्या माहितीवरुन स्पष्ट होतं आहे.

पाहा >> Shraddha Murder Case Photos: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे, कबुली जबाब अन् थेट ‘त्या’ जंगलात आफताबबरोबर पोहोचले पोलीस

Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
raj Rajshekhar emotional letter written to grandfather Rajshekhar
“प्रिय आजोबा…”, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
Rupali Bhosle will missing milind gawali after off air aai kuthe kay karte serial
‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”
Anant Madhavan
सेटवर लागलेली आग, ५२ जणांचा मृत्यू आणि प्रसिद्ध अभिनेत्यावर ७३ सर्जरी; अनंत माधवन आठवण सांगत म्हणाले, “ती रात्र…”

श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नादरने श्रद्धासंदर्भात तिच्या पालघरमधील कुटुंबियांना कळवले होते. श्रद्धा अडचणी असल्याचं लक्षात आल्यानंतर लक्ष्मणने तिच्या घरच्यांना कळवलं होतं. सप्टेंबर महिन्यापासून श्रद्धा कुठे आहे? काय करतेय याची कोणतीही माहिती समोर न आल्याने या प्रकरणामध्ये प्राथमिक तपास सुरु करण्यात आला होता. इंडिया टुडेशी बोलताना लक्ष्मणने श्रद्धा आणि आफताबमध्ये अनेकदा वाद व्हायचे असं सांगितलं. “एकदा तिने व्हॉट्सअपवर माझ्याशी संपर्क साधला होता आणि माझी घरातून सुटका करं अशी मागणी केली होती. त्यावेळेस तिने मी याच्याबरोबर आज रात्री थांबले तर तो मला मारुन टाकेल, असंही म्हटलं होतं,” अशी माहिती लक्ष्मणणने दिली.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी Google चा वापर, मोठा फ्रिज, अगरबत्ती अन्…; आफताबने दिली कबुली

या मेसेजनंतर लक्ष्मण त्याच्या काही मित्रांबरोबर श्रद्धाच्या छत्रापूर येथील घरी गेला आणि त्याने आफताबला पोलीसांकडे जाण्याचा इशारा दिला. “मात्र श्रद्धाने आफताबविरोधात पोलीसांकडे जाण्यासंदर्भात सहमती न दर्शवल्याने आम्ही प्रकरण पोलीस स्थानकापर्यंत नेलं नाही,” असं लक्ष्मण म्हणाला. मागील दोन महिन्यांपासून श्रद्धाने संपर्क करणं बंद केल्याने आपल्याला तिची चिंता वाटत होती असं लक्ष्मणने सांगितलं.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “आम्ही कोळी हिंदू आणि तो मुस्लीम…”; श्रद्धाच्या वडिलांनी FIR मध्ये काय म्हटलं? घर सोडताना शेवटचे शब्द…

“तिने माझ्या मेसेजेसला रिप्लाय करणं थांबवलं. अखेर मला फार चिंता वाटू लागली. मी तिच्या आणि माझ्या ओळखीतल्या काही कॉमन फ्रेण्ड्सकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र तिची कोणतीही माहिती मिळत नसल्याने मी तिच्या भावाला याबद्दलची कल्पना दिली. मागील काही महिन्यांपासून तिच्याशी संपर्क झालेला नाही. आपण पोलिसांची मदत घेतली पाहिजे, असं तिच्या भावा कळवलं,” अशी माहिती लक्ष्मणने दिली.

“श्रद्धा आणि आफताब हे २०१८ पासून रिलेशनशीपमध्ये होते. सुरुवातीला ते फार आनंदात होते. त्यानंतर आफताब आपल्याला मारहाण करतो असं श्रद्धा सांगायची. तिला त्याच्याबरोबर नव्हतं राहायचं. तिला त्याला सोडायचं होतं. मात्र असं करणं तिला जमलं नाही आणि ते नोकरीच्या निमित्ताने दिल्लीला स्थायिक झाले,” असं श्रद्धाचा मित्र रजत शुक्ला याने एएनआयशी बोलताना सांगितलं.

लक्ष्मणकडून माहिती मिळाल्यानंतर श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात ६ ऑक्टोबरला तक्रार दाखल केली. श्रद्धाचे वसईतच राहणाऱ्या आफताब पुनावालाशी २०१८ पासून प्रेमसंबंध होते. ते दोघे एकत्र कॉल सेंटरमध्ये नोकरी करीत होते. तिने या संबंधांची माहिती आपल्या कुटुंबियांनाही दिली होती. मात्र कुटुंबियांनी त्यांच्या आंतरधर्मीय प्रेमसंबंधाला विरोध केला होता. आई-वडीलांचा विरोध डावलून ती आफताबबरोबर नायगाव येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनीही तिच्याशी संबंध तोडले होते. मार्चमध्ये ते दोघे दिल्लीला राहायला गेले. तेव्हापासून तिचा कुणाशीही संपर्क नव्हता.

नक्की वाचा >> Shraddha Walkar Murder: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवणाऱ्या आफताबला ‘या’ वेब सिरीजमधून सुचली हत्येची कल्पना

माणिकपूर पोलिसांच्या तांत्रिक तपासात श्रद्धाचा फोन मे पासूनच बंद असल्याचे आढळले. याबाबत पोलिसांनी आफताब पुनावाला याला चौकशीसाठी बोलावले होते. ‘‘ती भांडण करून घरातून निघून गेली, पण कुठे गेली ते मला माहीत नाही’’, असे उत्तर त्याने पोलिसांना दिले. परंतु पोलिसांना त्याच्या बोलण्यात विसंगती आढळली. पोलिसांनी दिल्लीत जाऊन पडताळणी केली आणि त्यांचा संशय बळावला. दिल्ली पोलिसांच्या मदतीने माणिकपूर पोलिसांनी आफताबची कसून चौकशी केली असता श्रद्धाच्या हत्येचा गुन्हा उजेडात आला, असे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी सांगितले.