देशातील करोना संसर्ग कमी होताना दिसत असला तरीही अद्याप करोनाचा धोका टळलेला नाही. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर, देशभरात लसीकरण मोहीम देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी, देशात नाकावाटे देता येणाऱ्या लसीवर संशोधन सुरू आहे, असं सांगत देशवासियांना महत्वपूर्ण माहिती दिली.

मोदींची मोठी घोषणा! १८ वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार करणार मोफत

“करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी लहान मुलांबाबत चिंता व्यक्त केली होती. या दिशेने देखील दोन लसींची ट्रायल वेगाने सुरू आहे. याशिवाय आता देशात एका नेजल व्हॅक्सिनवर देखील संशोधन सुरू आहे. याला सूई वाटे न देता नाकात स्प्रे केलं जाणार आहे. देशाला जर नजीकच्या काळात या लसीवर यश मिळालं तर यामुळे भारताच्या लसीकरण मोहीमेस आणखी गती येईल.” असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

Corona Vaccine: लस मिळायला का उशीर होतोय? मोदींनी सांगितलं कारण…

तसेच, दुसरीकडे लशीच्या तुटवड्यावरून बहुतांश राज्यांमध्ये ओरड होत आहे. अनेक राज्यांनी जागतिक पातळीवर निविदा काढल्या आहेत. मात्र, या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने आता विरोधकांकडून मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला लसीकरणाच्या धोरणावरून सुनावलं होतं. लसीकरणासंदर्भात उपस्थित झालेल्या लसीकरणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील लस उत्पादन आणि लसीकरणाच्या वेगावरही सरकारची भूमिका मांडली.

Coronavirus : खासगी रुग्णालयांमधील लसींच्या मनमानी किंमतीवर मोदी सरकारचा चाप; जाहीर केला मोठा निर्णय

याचबरोबर, केंद्र सरकारने भारतामधील लसीकरणासंदर्भातील मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सगळ्यांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यांना सर्व लसी मोफत देण्यात येतील. तर एकूण लसींपैकी २५ टक्के लसी या खासगी क्षेत्राला देण्यात येणार आहे. याशिवाय मोदींनी लसीच्या किंमतीपेक्षा जास्तीत जास्त १५० रुपये आकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. म्हणजेच खासगी रुग्णालयांमध्ये लसीच्या किंमतीपेक्षा केवळ १५० रुपये अधिक घेऊन लस दिली जाणार आहे.

Story img Loader