मृत्यू हा शाश्वत असून तेच अंतिम सत्य आहे, असे अनेक धर्म सांगतात. पण मृत्यू कधी गाठेल, याचा अंदाज आजवर कुणालाही सांगता आलेला नाही. हल्ली कृत्रिम बुद्धिमत्तेने (artificial intelligence) आपले भवताल व्यापायला सुरुवात केली आहे. एक नवी डिजिटल क्रांती यानिमित्ताने होऊ पाहत आहे. आतातर शास्त्रज्ञ अशा एआय टूलवर काम करत आहेत, ज्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीची आरोग्याची पार्श्वभूमी, शिक्षण, नोकरी आणि उत्पन्न याचा अभ्यास करून सदर व्यक्तीचे निधन कधी होऊ शकते किंवा किती आयुष्य जगू शकतो, याचीही माहिती मिळू शकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे वाचा >> शस्त्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता डॉक्टरांच्या मदतीस, काय आहे हा प्रकार.

life2vec या नावाच्या एआय टूलला डेन्मार्कच्या संपूर्ण लोकसंख्येचा डेटा पुरविला गेला. डेन्मार्क सरकारने केवळ संशोधकांना संशोधन करण्यासाठी हा डेटा उपलब्ध करून दिला होता. नॉर्थईस्ट विद्यापीठाच्या माहितीनुसार, एआय टूलने जटिल डेटाचे विश्लेषण करून अत्याधुनिक मॉडेल्सचा वापर करत भविष्यातील घडामोडी, व्यक्तीचा जीवनकाळ याबाबतची माहिती प्रदान केली आहे. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार नॉर्थईस्ट विद्यापीठातील संगणक विज्ञान विभागाच्या प्राध्यापक टीना एलियासी यांनी सांगितले, “एआय मॉडेल्सचा वापर करून आम्ही अचूक अंदाज वर्तवित असलो तरी याचा वापर वास्तविक लोकांचे भविष्य वर्तविण्यासाठी करण्यात येऊ नये, असे आमचे मत आहे. विशिष्ट लोकसंख्येचा डेटा वापरून त्यावर अंदाज व्यक्त करण्यासाठी हे मॉडेल वापरले जावे.”

शास्त्रज्ञांनी हे एआय टूल विकसित करत असताना त्यात मानव केंद्रीत दृष्टीकोन आणण्यासाठी एआय नीतिशास्त्र तज्ज्ञ आणि इतर सामाजिक शास्त्रज्ञांची मदत घेतली. “तुमच्याकडे असलेली धोरणे, नियम आणि कायदे या माध्यमातून समाजाकडे एका वेगळया परिप्रेक्ष्यातून पाहण्याची दृष्टी या टूलद्वारे मिळते. जमिनी स्तरावर काय परिस्थिती आहे, त्यातील बारकावे समजण्यासाठी या टूलचा वापर होऊ शकतो, असे एलियासी यांनी सांगितले.

आणखी वाचा >> अग्रलेख : बुद्धिमत्तेचा कृत्रिम ‘भस्मासुर’!

life2vec कसे काम करते?

नेचर कम्प्युटेशनल सायन्स या जर्नलमध्ये या महिन्यात प्रकाशित झालेल्या शोधनिबंधाचे सहलेखक सून लेहमन यांनी माहिती देताना म्हटले, इतर कोणत्याही एआय मॉड्युल्सपेक्षा हे जगाचे सर्वसमावेशक असे प्रतिबिंब दाखवेल. टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ डेन्मार्कचे प्राध्यापक असलेल्या लेहमन यांनी हे टूल विकसित केले आहे. लेहमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००८ पासून ते २०२० पर्यंत डेन्मार्कच्या ६० लोकांच्या डेटावर संशोधन करण्यात आले. या टूलचे अंदाज जवळपास ७५ टक्के अचूक ठरले असल्याचे सांगण्यात येते.

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, टूलचे अंदाज काढण्यासाठी चॅटजीपीटीच्या तंत्रज्ञानाता वापर करण्यात आला आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणते टप्पे, कसे आले? याची माहिती जोडून ती व्यक्ती किती आयुष्य जगू शकते? याचा अंदाज वर्तविण्यात आला.

चॅटजीपीटीचा वापर सर्जनशील मजकूर किंवा व्यावसायिक आव्हाने पेलण्यासाठी बहुतेककरून केला जातो. तर दुसरीकडे life2vec च्या माध्यमातून व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित बाबींचे संशोधन केले जाते. जसे की, या टूलच्या माध्यमातून व्यक्तीचा वैयक्तिक इतिहासाचा खोलवर जाऊन अभ्यास केला जातो. अभ्यासाअंती संबंधित व्यक्तीचे यश, त्याचा फॅशन सेन्स याबाबत अनुमान काढले जाते. तसेच टूलच्या माध्यमातून त्या व्यक्तीचे वय किती असेल, याचीही माहिती दिली जाते.