अमेरिकेत करोना विषाणूवर प्राथमिक लस तयार करण्यात आली असून त्याच्या चाचण्या सोमवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या स्वयंसेवकास लस टोचण्यात आली असून या चाचण्यांची सार्वजनिक वाच्यता करण्यात आलेली नाही. दी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ या संस्थेने  पेरमॅनेट वॉशिंग्टन हेल्थ रीसर्च इन्स्टिटय़ूट या सियाटलमधील संस्थेत लशीच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. या लशीची चाचणी पूर्ण होण्यास एक वर्ष ते १८ महिने लागतील असे सांगण्यात आले.

४५ स्वयंसेवक तरुणांवर या चाचण्या वेगवेगळ्या मात्रेत केल्या जाणार असून एनआयएच व मॉडेर्ना इनकार्पोरेशन यांनी ही लस तयार केली आहे. यातून स्वयंसेवकांना संसर्ग होण्याची भीती नाही. कारण त्यात विषाणू नाही. जगात हजारो संशोधक लशीसाठी प्रयत्नशील असून काहीजण तात्पुरती लस तयार करीत आहेत.  त्यातून एक ते दोन महिने विषाणूपासून संरक्षण मिळू शकते. अनेकांमध्ये करोनाची ताप व कफ ही लक्षणे दिसली आहेत. वृद्धांमध्ये मात्र तो गंभीर आजारास कारण ठरतो.

या लसीला एमआरएनए-१२७३ असे सांकेतिक नाव देण्यात आले आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ आणि मॅसॅच्युसेट्समधील मोडेर्ना या बायोटेक कंपनीने संयुक्तरित्या ही लस विकसित केली आहे. जगभरातील दीड लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे.

जर्मनी विकाऊ नाही- अल्टामियर

जर्मनीतील कंपनीने लशीबाबत केलेल्या संशोधनाचे हक्क विकत घेऊन अमेरिकेने लस तयार करण्याचे प्रयत्न चालवले आहेत, असे एक वृत्त जर्मनीतील वृत्तपत्रात आले आहे. जर्मनीचे अर्थमंत्री पीटर अल्टामियर यांनी सांगितले की, ‘‘आम्ही लशीचे संशोधन विकायला बसलेलो नाही, जर्मनी विकाऊ नाही.’’  ट्रम्प  हे लशीच्या संशोधनाचे अधिकार विकत घेऊन लस तयार करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची बातमी वेल्टॅम सोनॅटॅग या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. ट्रम्प यांनी लशीच्या संशोधनाची माहिती केवळ अमेरिकेला मिळावी यासाठी लाखो डॉलर्स देऊ केले आहेत. अमेरिकी अधिकाऱ्यांनी यावर सांगितले की आम्ही अनेक कंपन्यांना लशीसाठी बीड भांडवल दिले आहे, पण आता जी बातमी आली आहे ती अतिरंजित आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Researchers in us give first shot to person in experimental covid 19 vaccine test scsg