काळ्या पैशांचे पांढऱयात रुपांतर करण्यासाठी गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि ऍक्सिस बॅंकांवर कारवाई सुरू करण्यात आल्याचे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान यांनी सांगितले. 
कोब्रापोस्ट या वृत्तसंकेतस्थळाने स्टिंग ऑपरेशनच्या साह्याने या तिन्ही बॅंकात काळ्या पैशांचे पांढऱयामध्ये रुपांतर केले जात असल्याचा आरोप केला होता. या तिन्ही बॅंकांच्या देशातील विविध शाखांमध्ये हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. या आरोपांनंतर तिन्ही बॅंकांनी अंतर्गत पातळीवर त्यांची चौकशी सुरू केली होती. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंकही आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि ऍक्सिस बॅंकेची चौकशी करीत होती.
तिन्ही बॅंकांची चौकशी पूर्ण झालीये. आता त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. व्यवस्थेच्या पातळीवर आणि बॅंकांवर थेटपणे कारवाई करण्यात येत असल्याचे खान यांनी सांगितले. कारवाईबद्दल सविस्तर माहिती तूर्त देता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या चौकशीचा अहवालही लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा