देशाची दोन महत्त्वाची खाती, कायदेमंत्री अश्विनीकुमार व रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्यावरील आरोप आणि त्यानंतर त्यांचे राजीनामे या सर्वांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आतातरी प्रामाणिक आत्मपरिक्षण करावे आणि स्वत:हून पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे, हाच एकमेव पर्याय त्यांच्यासाठी असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. तसेच आगामी निवडणुका यातर फक्त वैकल्पिक ठरतील कारण यूपीए सरकार आर्थिक व्यवहार, अंतर्गत व आंतराष्ट्रीय सुरक्षा आणि प्रशासन या सर्व बाबतीत अपयशी ठरले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी आत्मपरिक्षण केले तर त्यांच्यासमोर आता फक्त राजीनामा देण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे दिसेलय असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
अश्विनीकुमार यांनी कोलगेट तपासाबाबतच्या स्थितीदर्शक अहवालात फेरफार करुन कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत ते सांगावे नुसता राजीनामा देऊन भागणार नाही असा अश्विनीकुमार यांना लक्ष्य करत राजनाथ सिंह यांनी सवाल उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा