पीटीआय, लिस्बन : गर्भवती असलेल्या एका भारतीय प्रवासी महिलेचा पोर्तुगालमध्ये रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्यामुळे पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री डॉ. मार्टा टेमिडो यांनी गुरुवारी राजीनामा दिला आहे, तर महिलेच्या मृत्यूप्रकरणी अधिकाऱ्यांनी चौकशीही सुरू केली आहे. राजधानी लिस्बनमधील सांता मारिया रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र विभागात दाखल करून घेण्यासाठी कर्मचारी वर्ग नसल्याने तेथून या ३४ वर्षीय भारतीय महिलेला अन्य एका रुग्णालयात हलवण्यात येत होते. त्या वेळी रुग्णवाहिकेतच हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांनी पदाचा राजीनामा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संपूर्ण पोर्तुगालमधील रुग्णालयांत रुग्णालयांतील प्रसूतीशास्त्र विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने अशा अनेक घटना घडल्याची टीका करण्यात येत असल्याचे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे. ‘‘डॉ. मार्टा टेमिडो यांनी केलेल्या आतापर्यंतच्या कार्याबद्दल मी कृतज्ञ आहे. विशेषत: करोना साथीचा सामना करण्याचा काळ हा कसोटीचा काळ होता. पोर्तुगालमधील आरोग्यसेवांमध्ये सुधारणा करण्याचे सरकारचे प्रयत्न चालू आहेत,’’ असेही पंतप्रधान अँटोनियो कॉस्टा यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे. कॉस्टा हे भारतीय वंशाचे आहेत.

पोर्तुगालमधील सर्वात मोठय़ा सांता मारिया रुग्णालयाच्या प्रसूतीशास्त्र विभागात दाखल करून घेण्यासाठी खाट नसल्याने गर्भवती पर्यटक महिलेला अन्यत्र हलवण्यात येत असताना तिचा मृत्यू झाल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. मात्र, परंतु खाट नसल्याने तिला अन्यत्र हलवण्यात येत होते, की कर्मचारी वर्गाच्या कमतरतेमुळे, हे स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणेने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. या महिलेवर तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या बाळाची प्रकृती चांगली झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

व्यथित झाल्याने पदत्याग

डॉ. मार्टा टेमिडो २०१८ पासून आरोग्यमंत्रीपद सांभाळत होत्या. करोना विषाणूच्या महासाथीच्या संकटाला यशस्वीपणे तोंड देण्याचे श्रेय टेमिडो यांना दिले जाते; परंतु गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे त्या व्यथित झाल्या. आपल्याला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याची जाणीव टेमिडो यांना झाल्यामुळे त्यांनी पदत्याग केला, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे.