किरकोळ बाजारात भाज्या आणि डाळींच्या किंमती पडल्याने, मे महिन्यात देशाचा महागाईदर २.१८ टक्क्यांवर आला आहे. एप्रिलमध्ये महागाई दर २.९९ टक्के होता. मात्र खाद्यजन्य पदार्थांच्या किंमतींमध्ये सातत्याने घट बघायला मिळाली. २०१२ नंतरचा हा सगळ्यात कमी महागाई दर आहे असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. २०१२ पासून महागाई दरांसंदर्भातली आर्थिक सूची केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात येते. आज ही सूची जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये मे महिन्यात महागाई दर २.१८ टक्क्यांवर आल्याचे सरकारने नमूद केले आहे. हा देशातला मागील पाच वर्षातला सर्वात कमी महागाई दर असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा