Retd Police mercilessly drives Over Puppy 4 times Crime News : उत्तर प्रदेशमध्ये एका ७१ वर्षीय निवृ्त्त पोलिस अधिकार्‍याने एका कुत्र्‍याच्या पिल्लाला चार वेळा गाडीने चिरडल्याचा धक्कादायक प्रकर समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावर झोपलेल्या कुत्र्‍याच्या या पिलाला चार वेळा कारने चिरडल्याची ही घटना उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महूआ मोईत्रा यांनी देखील याची गंभीर दखल घेतली आहे. मोईत्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांचे लक्ष या व्हिडीओकडे वेधले गेले.

दरम्यान या व्हायरल व्हिडीओ हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले फुटेज आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती त्याची कार ३५ दिवसांच्या एका कुत्र्‍याच्या पिलाच्या अंगावरून अनेकवेळा घालताना दिसत आहे. नाव न देण्याच्या अटीवर शेजार्‍यांनी सांगितले की, या घटनेत कुत्र्‍याचे पिल्लू हे जागेवरच ठार झाले.

तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी त्यांच्या एक्स पोस्टच्या माध्यमातून पोलिसांना या घटनेतील आरोप असलेले सुखवीर सिंग यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या व्यक्तीचा संपर्क आणि कार रजिस्ट्रेशन नंबर देखील त्यांच्या पोस्टमध्ये शेअर केला आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी सिग यांच्या विरोधात प्राणी क्रूरता अधिनियम अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान या घटनेनंतर सुखवीर सिंग यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले होते, मात्र नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

आरोपी हा उत्तर प्रदेश पोलीस सेवेतून २०१५ साली निवृत्त झाला आहे. त्याचा दावा आहे की त्याला ऐकू येत नाही आणि त्याने कुत्र्‍याच्या पिलाचे रडणे ऐकू आले नाही. कारचे अरसे झाकलेले असताना तो गाडी मागे घेत होता. तरीही हे जाणूवपूर्वक करण्यात आले आहे का याचा आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती तपास करत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने दिली.