जम्मू काश्मीर कॅडरमधील एका सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीने तिच्या सावत्र मुलावर बलात्काराचा आरोप केला आहे. ही महिला सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्याची दुसरी पत्नी असून तिने तिचा सावत्र मुलगा आणि जावयावर बलात्काराचा आरोप करत गाझीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच हुंड्याची मागणी करत सासरकडच्या मंडळींनी तिला हातपाय बांधून मारहाण केल्याचाही आरोप केला आहे. ही घटना बांदीपुरा भागात घडल्याने गाझीपूर पोलिसांनी हे प्रकरण संबंधित पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित केलं आहे.

ही महिला मूळची लखनौची रहिवासी आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये तिचं जम्मू-काश्मीरमधील बांदीपुरा येथील सेवानिवृत्त आयएएस अधिकऱ्याशी लग्न झालं होतं. या महिलेने सांगितलं की तिचे पती २०१० मध्ये सेवानिवृत्त झाले आणि २०१८ मध्ये त्यांच्या पत्नीचं निधन झालं. त्यांच्या पहिल्या पत्नीची चार मुलं आहेत.

हे ही वाचा >> हॉस्टेलमधील किळसवाणा प्रकार; चटणीत तरंगताना दिसला चक्क जिवंत उंदीर, विद्यार्थ्यांचा संताप; Video व्हायरल

महिलेने पोलिसांना सांगितलं की, सासरी गेल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांपासूनच सासरकडच्या लोकांनी मला हुंड्यासाठी छळ करायला सुरुवात केली. या महिलेने पोलिसांना सांगितलं की, एप्रिल महिन्यात तिच्या सावत्र मुलाने आणि जावयाने तिला घरात बांधून ठेवलं आणि पाच दिवस दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिला जबर मारहाणही केली. दरम्यान, तिच्या पतीने आणि घरातील इतर सदस्यांनी तिचे काही व्हिडीओ चित्रित करून ठेवले आहेत. महिलेचं शोषण चालू असताना तिची प्रकृती खालावली. त्यामुळे तिच्या नवऱ्याने तिला माहेरी पाठवलं. तत्पूर्वी साध्या स्टॅम्प पेपर्सवर तिच्या सह्या देखील घेतल्या.

हे ही वाचा >> ‘येथे पोलीस असतात…’ गूगल मॅपने दाखवलं ट्रॅफिक पोलिसांचं थेट लोकेशन; व्हायरल पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

गुन्हा दाखल

गाझीपूरचे पोलीस निरीक्षक विकास राय यांनी सांगितलं की “पीडित महिलेच्या तक्रारीनुसार सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्यासह त्याच्या कुटुंबातील सहा सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपसादरम्यान आम्हाला समजलं की ही घटना जम्मू काश्मीरच्या बांदीपुरा भागात घडली आहे. पुढील तपासासाठी आम्ही हे प्रकरण बांदीपुरा पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित केलं आहे. बांदीपुरा पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.”

Story img Loader