retired cop predicted he would be killed Crime News : झाकीर हुसेन बिजली हे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक हे एकेकाळी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा भाग होते. मात्रमंगळवारी तिरुनेलवेली येथे जमिनीच्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली आहे. ६४ वर्षीय हुसेन हे सकाळच्या नमाजनंतर मोटारसायकलवरून घरी जात असताना हल्लेखोरांनी त्यांना गाडीतून ओढून खाली पाडले आणि त्यांच्या डोक्यावर वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात हुसेन यांचा मृत्यू झाला. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, हुसेन यांनी त्यांची हत्या होणार असल्याबद्दल आधीच भीती व्यक्त केली होती.
जवळून जाणाऱ्या लोकांनी आरडाओरड केल्यानंतर हुसेन यांचे मारेकरी घटना स्थळावरून पसार झाले, यानंतर या घटनेबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली. पण हुसेन यांनी हे होणार असल्याबद्दल आधीच सांगून ठेवलं होतं. हुसेन यांनी दिलेल्या तक्रारी, त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेला व्हिडीओ या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आले.
या हत्येबद्दल बोलताना हुसेन यांना ओळखणाऱ्या तिरुनेलवेली येथील एका निवृत्त अधिकार्याने सांगितले की, “त्याने आतून यंत्रणा काम करत असल्याचे पाहिले होते. ती कधी बिघडेल हे त्याला माहित होते.” त्यांची हत्या होण्याच्या काही दिवस आधी, हुसेन यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की त्यांना ठार केले जाईल आणि हल्लेखोर कोण असू शकतात याचा अंदाजही हुसेन यांनी लावला होता.
दरम्यान या कथित जमिनीचा वाद तिरुनेलवेली शहरातील एका जुन्या दर्ग्याजवळील ३६ सेंट जमिनीवरून होता. मुर्तिम झरखान दरग्याचे काम हे हुसेन पाहच होते आणि नूरूनिस्सा नावाच्या महिलेकडून जमीन परत मिळवण्यासाठी त्यांचा कायदेशीर लढा सुरू होता. ज्या महिलेकडे ही जमीन होती तिचा दावा होता की, तिला ही जमीन वारशाने तिच्या आजीकडून मिळीली आहे. या महिलेने कृष्णमूर्ती या दलीत व्यक्तीबरोबर लग्न केले. या लग्नानंतर त्या व्यक्तीने मोहम्मद तौफीक (३२) हे नाव धारण केले.
नेमकं प्रकरण काय आहे?
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “हा वाद २०२२ पासून सुरू होता. हुसेन याचे म्हणणे होते की जमीन वक्फ बोर्डाची आहे. नूरूनिस्सा आणि तौफीक यांचे म्हणणे होते की जमीन त्यांच्या कुटुंबियांची आहे. गेल्या वर्षी हा वाद चांगलाच वाढला. डिसेंबर महिन्यात तौफीक आणि नूरूनिस्सा यांनी पोलिसांत हुसेनविरोधात तक्रार दाखल केली आणि त्याच्यावर छळ आणि बेकायदा ताबा घेतल्याचे आरोप केले. पोलिसांनी हुसेनविरुद्ध एससी/एसटी (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.”
निवृत्त पोलीस अधिकारी हुसेन यांनी देखील संतापून जिल्हा अधिकारी आणि कमीशनर यांच्याकडे तौफीक याचे कुटंब आणि दोन पोलिस अधिकारी – पोलीस निरीक्षक गोपाला कृष्णन आणि सहाय्यक आयुक्त सेंथिल कुमार – यांनी एससी/एसटी कायद्याअंतर्गत गु्न्हा दाखल केल्याप्रकरणी तक्रार केली. हुसेन यांनी जारे केलेल्या व्हिडीओमध्ये हुसेन यांनी दावा केला की त्यांच्याविरुद्धचा खटला एक सापळा आहे आणि ते दोन्ही पोलीस अधिकारी त्यांना जीव घेऊ इच्छिणाऱ्यांची बाजू घेत आहेत.
मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर, फेब्रुवारीमध्ये त्यांन सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये सांगितले की त्यांच्या जीवाला धोका आहे, पण त्यांचे कोणीही ऐकले नाही.
मंगळवारी हुसेन यांची हत्या झाल्यानंतर, हुसेन यांच्या कुटुंबाने तिरुनेलवेली मेडिकल कॉलेज रुग्णालयातून त्यांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यांचे नातेवाईक आणि समर्थक न्यायाची मागणी करत गोळा झाले. पोलिसांनी त्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी सांगितले.
दुपारीपर्यंत दोघे कार्तिक आणि अकबर शाह हे कोर्टासमोर शरण आले. यापैकी पहिला तौफीकचा भाऊ असून दुसरा त्याचा मेहुणा आहे. बुधवारी पोलिसांनी तौफीक याला तिरुनेलवेली शहराबाहेरून अटक केली. त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला असता तो पळाला, यावेळी त्याला थांबवण्यासाठी पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी चालवली ज्यामध्ये तो जखमी झाला. तौफीकची पत्नी नूरूनिस्सा ही अद्याप फरार आङे.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनी या प्रकारचा राज्याच्या विधानसभेत बुधवारी निषेध केला आणि कोणीही कायद्याच्या तावडीतून सुटणार नाही असेही त्यांनी सांगितले. या मुद्दा विधानसभेत उपस्थित करणारे विरोधीपक्षाचे नेते इडाप्पडी के. पलानीसामी यांनी पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी केली.
भाजपा आणि पीएमके यांनी या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे. भाजपाचे अध्यक्ष के अन्नामलाई यांनी तमिळनाडूमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप केला.