पुणे : राजकारण्यांनीही निवृत्त व्हायला हवे. त्यासाठी वयाची मर्यादा असावी असे मला वाटते. वयाच्या साठाव्या वर्षी राजकारणातून निवृत्ती घेणे योग्य राहील, असे मत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. पंतप्रधान मोदींना माझ्याविषयी राग आणि द्वेष आहे. पण मला त्यांच्याविषयी राग नाही. मला मोदी आवडतात. ‘आय लव्ह मिस्टर मोदी’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींबाबतची भावना व्यक्त केली.
राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुण्यात विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. अखिल भारतीय युवक काँग्रेस आणि युवा सुराज्य फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना राहुल गांधी यांनी या वेळी मनमोकळी उत्तरे दिली. गरिबांना वार्षिक ७२ हजार रुपये देण्याची काँग्रेसची घोषणा, मोदींबाबतची भावना, रोजगारनिर्मिती, पक्षाचा जाहीरनामा याबाबत राहुल गांधी यांनी त्यांची मते स्पष्ट केली.
राजकारणात वयाच्या कितव्या वर्षी निवृत्त व्हावे? त्यासाठी वयाची मर्यादा असावी की नाही? असा प्रश्न राहुल यांना विचारण्यात आला. ‘राजकारणात निवृत्त होण्यासाठी वयाची नक्कीच मर्यादा असावी, असे मला वाटते. वयाच्या साठाव्या वर्षी राजकारण्यांनी निवृत्ती घ्यावी,’ असे ते म्हणाले.
पंतप्रधान प्रश्नांपासून पळ काढत आहेत. मी आज ज्या व्यासपीठावर उभा आहे, तिथे पंतप्रधानांनी उभे राहणे अपेक्षित आहे. मोदी यांनी लोकांच्या प्रश्नांना सामोरे गेले पाहिजे. पण ते तसे करीत नाहीत. त्यांना प्रश्न नको आहेत. नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. देशातील लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. नोटबंदीनंतर फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी नवीन उद्योजकांना उभारी देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे, असेही ते म्हणाले. गरिबांना वार्षिक ७२ हजार रुपये देताना मध्यमवर्गीयांवर कोणताही कर लादला जाणार नाही. न्याय योजनेसाठी निधी उपलब्ध होऊ शकतो. त्याबाबतचा विचार आम्ही केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविण्यात येईल, असेही राहुल यांनी सांगितले.
‘आय लव्ह मिस्टर मोदी’ अन् मोदींच्या नावाच्या घोषणा
लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गांधी घराण्यावर टीका करण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदी यांच्याबाबतची भावना व्यक्त केली. मोदींना माझ्याविषयी राग आणि द्वेष आहे. मला त्यांच्याविषयी राग नाही आणि तिरस्कारही नाही. माझे मोदींवर प्रेम आहे, असे राहुल गांधी यांनी सांगताच सभागृहातील विद्यार्थ्यांनी मोदी, मोदी अशा घोषणा दिल्या. तेव्हा तुम्ही घोषणा देण्यात मला काही गैर वाटत नाही, असे राहुल म्हणाले.
राहुल गांधींवर सुबोध भावेचा चरित्रपट
आरजे मलिष्का आणि अभिनेता सुबोध भावे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुबोध भावे याने राहुल गांधी यांच्यावर चरित्रपट तयार करणार असल्याचे सांगितले. राहुल गांधी हा माणूस फक्त राजकारण करत असावा, असे मला प्रारंभी वाटत होते. मात्र राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा माणूस भरपूर काही गोष्टी करतो. ते स्कुबा डायव्हर, कराटे चॅम्पियन आणि पायलट आहेत. त्यांच्याशी संवाद साधल्यावर मला या गोष्टी समजल्या. त्यामुळे त्यांच्यावर चरित्रपट काढण्याची इच्छा आहे, असे भावे यांनी सांगितले. दरम्यान, लग्न कधी करणार, असा प्रश्न एका विद्यार्थ्यांने विचारला असता माझे लग्न कामाशी झाले आहे, असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले.