पीटीआय, हैदराबाद

प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत रेवंत रेड्डी यांनी तेलंगणच्या मुख्यमंत्रीपदाची गुरुवारी शपथ घेतली. राज्यपाल तमिळसाई सौंदरराजन यांनी रेड्डी तसेच मंत्रीमंडळातील इतर सहकाऱ्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. येथील एल.बी.स्टेडियमवर हा भव्य सोहळा झाला.

Yashomati Thakur's allegations on Sunil Karhade of NCPSP.
Yashomati Thakur: “शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याकडून २५ लाखांची मागणी,” काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
Jitendra Awhad comment on Ajit Pawar,
साहेब जातात कधी याची वाटच अजित पवार पाहत आहेत, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
Thackeray said Modi being Vishwaguru cant avoid mentioning his name
मोदी विश्वगुरू असले तरी माझे नाव घेतल्याशिवाय त्यांना… उद्धव ठाकरे यांचा टोला

मल्लू भट्टी विक्रमरका यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर मंत्री म्हणून एन.उत्तमकुमार रेड्डी, कौमित्र वेंकट रेड्डी, सी.दोमदर राजनरसिंहा, डी.श्रीधर बालू, पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी, पोन्नम प्रभाकर, कोंडा सुरेखा, डी. अनुसया, टी. नागेश्वर राव आणि जुपली कृष्णराव यांनी शपथ घेतली. या सोहळय़ाला सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री शिवकुमार, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखिवदर सुख्खू उपस्थित होते.प्रगती भवन या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान तसेच कार्यालयाचे नामकरण ज्योतीराव फुले प्रजा भवन असे करण्यात येईल.

तातडीने निर्णय : शपथ घेतल्यानंतर रेड्डी यांनी दोन फाईलवर स्वाक्षरी केली. यामध्ये काँग्रेसने सहा हमी दिली आहे त्या आश्वासनाचा समावेश आहे. तर अपंग महिलांना नोकरी देण्याच्या आश्वासनाची पूर्ती रेड्डी यांनी घेतली.

हेही वाचा >>>महुआ मोईत्रांच्या बडतर्फीचा अहवाल आज लोकसभेत? खासदारांसाठी भाजपचा व्हीप जारी

कुशल संघटक : २०१७-१८ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये मलकगिरी मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. २०२१मध्ये पक्ष प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आल्यावर राज्यातील पक्ष नेत्यांची एकजूट करत त्यांनी केवळ दोन वर्षांत काँग्रेसला राज्यात सत्ता मिळवून दिली.

अभाविप ते मुख्यमंत्रीपद

रेवंत रेड्डी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकीय कार्याला सुरुवात केली. अर्थात या संघटनेत ते फार काळ नव्हते. २००७ मध्ये आंध्र प्रदेश विधानसभेवर अपक्ष म्हणून विजयी झाले. त्यानंतर तेलुगू देसम पक्षात त्यांनी प्रवेश केला. तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख झाली. २००९ तसेच २०१४ मध्ये तेलुगू देसम पक्षाकडून ते विधानसभेवर विजयी झाले. २०१५ मध्ये त्यांच्यावर विधान परिषद निवडणुकीत तेलुगू देसमला मत देण्यासाठी लाच घेतल्याचे आरोप झाले. त्यांना हैदराबाद कारागृहात ठेवण्यात आले. काही काळ ते सक्रीय नव्हते. त्यानंतर त्यांनी २०१७-१८ मध्ये तेलुगू देसम पक्षाचा राजीनामा दिला.