RG Kar Medical College Kolkata Case Verdict Updates : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयला शनिवारी विशेष न्यायालयाने दोषी ठरवलं. आता या प्रकरणी आज सियालदह न्यायालयाने आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. Live Law ने हे वृत्त दिलं आहे. या निकालाआधी दिवसभर जी सुनावणी पार पडली त्यात हे प्रकरण दुर्मिळातलं दुर्मीळ आहे असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. ९ ऑगस्ट २०२४ ला कोलकाता येथील आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी एका डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. रुग्णालयाच्या टाऊन हॉलमध्ये या डॉक्टरचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला होता. या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. हे क्रौर्य पाहून पोलीस आणि शवविच्छेदन करणारे डॉक्टरही हादरले होते. तसंच पुढील दीड महिना या महाविद्यालयात काम करणाऱ्या डॉक्टरांनी संप पुकारला होता. दरम्यान या प्रकरणी न्यायाधीश अनिर्बान दास यांनी निकाल दिला आहे. ते २.४५ ला न्यायालयात आले. त्यानंतर त्यांनी हा निर्णय दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा