दिल्लीतील करोल बाग परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने चपाती न दिल्याच्या कारणातून रिक्षा ओढणाऱ्या व्यक्तीची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. फिरोज खान असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो कचरा वेचण्याचं काम करतो. पोलिसांनी आरोपीला करोल बाग येथील एका उद्यानातून जेरबंद केलं आहे. हत्या केल्यानंतर आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हत्या झालेल्या ४० वर्षीय मृत व्यक्तीचं नाव मुन्ना आहे. मंगळवारी (२६ जुलै) तो रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडला होता. स्थानिकांनी त्याला रिक्षामधून आरएमएल रुग्णालयात नेलं. मात्र, प्राथमिक तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेची माहिती करोल बाग पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.

या गुन्ह्याच्या तपास सुरू असताना लखन नावाच्या प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले की, घटनेच्या दिवशी रात्री दहाच्या सुमारास तो विष्णू मंदिर मार्गावर मृत मुन्नासोबत बसला होता. यावेळी मुन्ना हॉटेलमधून आणलेले खाद्यपदार्थ खात होता. दरम्यान, येथे एक मद्यधुंद व्यक्ती तेथे आला आणि त्याने मुन्नाकडे जेवण मागितले. मुन्नाने त्याला एक चपाती दिली. पण आरोपीनं पुन्हा दुसरी चपाती मागितली, त्यामुळे मुन्नाने आरोपीला चपाती देण्यास नकार दिला.

हेही वाचा- पुणे : झारखंडमधील चोरटे गजाआड; दीड कोटींचे मोबाइल संच जप्त

त्यामुळे संतापलेल्या मद्यधुंद आरोपीनं मुन्नाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याचा विरोध केला असता आरोपीनं धारदार चाकुने मुन्नावर वार करून घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शी लखनने ४०० ते ५०० मीटरपर्यंत आरोपीचा पाठलाग केला, पण आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर लखनने जखमी अवस्थेत पडलेल्या मुन्नाला आरएमएल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तिथे डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून मुन्नाला मृत घोषित केलं.

हेही वाचा- कर्नाटकमध्ये भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येमुळे तणाव; मुख्यमंत्र्यांनी रद्द केले वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम

प्रत्यक्षदर्शीनं सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेत एका पार्कमधून त्याला अटक केलं. चौकशीदरम्यान आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजही मिळाले असून गुन्ह्यात वापरलेला चाकुही पोलिसांनी जप्त केला आहे.