पुरुषांकडे सूचक नजरेने पाहून महिला स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतात, असे वक्तव्य केल्याने मध्य प्रदेशमधील काँग्रेसचा एक नेता अडचणीत सापडला आहे. भाजपने या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे.
‘जब तक महिला तिरछी नजर से नहीं देखेगी, तब तक पुरुष उसे नहीं छेडेगा’ असे वक्तव्य सत्यदेव कटारा या माजी मंत्र्यांनी भिंद येथे एका जाहीर सभेत केले. काँग्रेसच्या वतीने पक्षाच्या प्रचारासाठी भिंद येथे एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे प्रवक्ते आणि आमदार विश्वास सारंग यांनी कटारा यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. महिलांबाबतचे हे अतिशय अनुदार उद्गार आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षा एक महिला असतानाही अशा प्रकारचे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी केला.

Story img Loader