Who Is Priya Saroj : उत्तर प्रदेशातील मच्छलीशहर लोकसभा मतदारसंघातून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या प्रिया सरोज सध्या देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. आज दुपारपासून सोशल मीडियावर असा दावा केला जात होता की, खासदार प्रिया सरोज आणि भारतीय क्रिकेट संघाचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंग यांचा साखरपुडा झाला आहे. पण आता प्रिया सरोज यांच्या वडिलांनी स्वतः याचे खंडन करत, हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवघ्या २५ वर्षांच्या असलेल्या प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. त्यांनी गेल्या वर्षी मे-जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील मच्छलीशहर मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्या दिल्ली विद्यापीठाच्या पदवीधर आहेत.

रिंकूशी साखरपुड्याचे वृत्त वडिलांनी फेटाळले

समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचे वडील आणि आमदार तूफानी सरोज यांनी एबीपी न्यूजशी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले की, “भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या कुटुंबातील सदस्यांनी आमच्या मोठ्या जावयाशी, रिंकू आणि प्रिया यांच्या लग्नाबाबत चर्चा केली आहे. आमचे थोरले जावई अलीगढमध्ये सीजेएम पदावर कार्यरत आहेत.”

समाजवादी पक्षाचे आमदार असलेले तूफानी सरोज पुढे म्हणाले की, “आम्ही या लग्नाबाबत गांभीर्याने विचार करत आहोत. लग्नाचा विषय असल्याने, खूप विचार करून निर्णय घ्यावा लागतो पण रिंकू आणि प्रिया यांचा साखरपुडा झाल्याची बातमी खरी नाही.”

२५ व्या वर्षी लोकसभेत

मच्छलीशहर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकलेल्या प्रिया सरोज या गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी वयात विजयी झालेल्या चार उमेदवारांपैकी एक आहेत. प्रिया सरोज फक्त २५ वर्षे ७ महिन्यांच्या आहेत. त्यांनी भाजप उमेदवार भोलानाथ यांचा ३५,८५० मतांनी पराभव केला होता.

प्रिया सरोज यांचे वडील तूफानी सरोज हे देखील मछलीशहर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांनी १९९९, २००४ आणि २००९ मध्ये या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली होती. यानंतर, त्यांची मुलगी प्रिया सरोज आता मच्छलीशहरचे प्रतिनिधित्व करत आहेत.

प्रिया सरोज यांची संपत्ती

प्रिया सरोज यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे ११ लाख २५ हजार ७१९ रुपयांची मालमत्ता असल्याचे जाहीर केले होती. त्याच्याकडे एकूण ७५,००० रुपये रोख आहेत. तर बँकेत १० लाख १८,७१९ रुपये जमा आहेत. प्रिया सरोज यांच्याकडे ३२ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rinku singh priya saroj engagement youngest mp indian politics samajwadi party cricketer aam