Dhivya Sashidhar अब्जाधीश प्रसन्न शंकर यांनी त्यांच्या पत्नीवर मुलाला लपवल्याचा आरोप केला आहे. तसंच दिव्या शशीधरचे म्हणजेच त्यांच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत असा आरोप प्रसन्न यांनी केल्यानंतर आता त्यांच्या पत्नीची पोस्ट समोर आली आहे. प्रसन्न हा Sexual Pervert आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच विविध आरोपही केले आहेत.

दिव्या शशीधर यांनी काय म्हटलं आहे?

“प्रसन्न हा Sexual Pervert आहे. शिवाय त्याला गुन्हेगारीची पार्श्वभूमीही आहे. प्रसन्न एके ठिकाणी नोकरी करत होता तेव्हा गैरवर्तन केल्याने त्याला ती नोकरी गमवावी लागली होती. ” असं दिव्या यांनी म्हटलं आहे. Rippling चे सहसंस्थापक प्रसन्न शंकर यांनी त्यांच्या पत्नीवर आरोप केल्यानंतर आता दिव्या शशीधर यांनी आरोप फेटाळले आहेत. तसंच त्यांनी US Embassy कडे मदत मागितली आहे.

दिव्या शशीधर यांनी मुलाबाबत काय म्हटलं आहे?

“मी माझ्या नऊ वर्षांच्या मुलाला मागच्या तीन आठवड्यांपासून पाहिलेलं नाही. मी आणि माझा मुलगा आम्ही दोघेही अमेरिकेचे नागरिक आहोत. तीन आठवड्यांपूर्वी माझ्या नवऱ्याने मला माझ्या मुलाला जबरदस्तीने भारतात आणलं आहे.” दिव्या शशीधर यांनी व्हिडीओ स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिली. प्रसन्नचा मित्र गोकुळ याने मला आणि माझ्या मुलाला अमेरिकेतून भारतात आणलं. आता माझा मुलगा कुठे आहे ते मला माहीत नाही. गोकुळने माझ्या मुलाला माझ्या नवऱ्याकडे सोपवलं आहे की आणखी कुठे ठेवलंय तेदेखील मला माहीत नाही. असंही दिव्या यांनी म्हटलं आहे. Financal Express ने हे वृत्त दिलं आहे.

दिव्या शशीधर यांचे प्रसन्न यांच्यावर आरोप काय?

प्रसन्न यांच्यावर आरोप करताना दिव्या शशीधर म्हणाल्या, प्रसन्नचं नाव काही लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणातही आलं आहे. त्याने काही वेळा गुप्तपणे महिलांचे व्हिडीओ शूट केले हेत. प्रसन्नने महिलांच्या प्रसाधनगृहांमध्ये छुपे कॅमेरे बसवले होते, तसंच काही महिलांच्या शयनकक्षातही छुपे कॅमेरे लावले होते. मी देखील याची शिकार झाले आहेत. सिंगापूर पोलिसांनी त्याला या प्रकरणात अटकही केली होती. त्यानंतर तिथल्या कोर्टाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला. अशीही माहिती दिव्या यांनी दिली. काही वर्षांपूर्वी प्रसन्नाला सॅनफ्रान्सिसको या ठिकाणी एका स्टिंग ऑपरेशनमध्ये solicitation and prostitution प्रकरणात अटक झाली होती. त्यामुळे त्याला त्याच्या कंपनीतील पद गमवावं लागलं होतं.

प्रसन्न आणि दिव्या यांच्यातला वाद काय?

प्रसन्न शंकर यांनी त्यांच्या एक्स पोस्टसच्या सीरिजमध्ये हे म्हटलं आहे की त्यांना खोट्या बलात्कार प्रकरणात आणि घरगुती हिंसाचार प्रकरणात अडकवण्यात आलं आहे. माझ्या घटस्फोटाचा खटला सुरु आहे. तसंच मुलाचा ताबा कुणाकडे असेल? यावरुनही कायदेशीर लढाई सुरु आहे. माझी पत्नी दिव्या हिचे अनुप नावाच्या माणसाशी विवाहबाह्य संबंध आहेत. अनुपच्या पत्नीनेच ही माहिती आपल्याला दिली आहे असाही दावा शंकर यांनी केला आहे. मात्र दिव्या शशीधर यांनी सगळे आरोप फेटाळून लावत त्यांच्यावरच आरोप केले आहेत.