ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात येतं आहे. ऋषी सुनक यांनी आडिडासचे स्नीकर्स घातले होते. ही स्नीकर्स घालून त्यांनी मुलाखत दिली त्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार होतो आहे. सोशल मीडियावर त्यांनी जे फोटो पोस्ट केले त्यावर यांनी तर सगळं चिरडलं अशा आशयाच्या कमेंट केल्या जात आहेत आणि त्यांना प्रचंड ट्रोल केलं जातं आहे.

नेमकं काय घडलं?

भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना १८० हून अधिक खासदारांचा पाठिंबा मिळाला आणि ते ब्रिटनचे भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान झाले. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी आडिडासचे स्नीकर्स घातले होते. ब्रिटन सरकारच्या करधोरणांवर बोलत असताना त्यांनी जर्मन ब्रांड असलेल्या आडिडासचे राखाडी आणि पांढऱ्या रंगाचे शूज घातले होते. तसंच पांढरा शर्ट आणि काळी पँट परिधान केली होती. आडिडासचे शूज घातल्याने त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं.

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Saif Ali Khan Attack
Saif Ali Khan : “फक्त सैफ अली खान याचं आडनाव खान आहे म्हणून…”, हल्ल्याबाबत गंभीर शंका घेणार्‍या आव्हाडांना गृहराज्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका
Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…
Gautam Gambhir abused my family Manoj Tiwary allegations on Gautam Gambhir
Manoj Tiwary : ‘त्याने माझ्या कुटुंबाला शिवीगाळ केली अन्…’, मनोज तिवारीने पुन्हा एकदा साधला गौतम गंभीरला केलं लक्ष्य

आडिडासने या शूजचं वर्णन काय केलं आहे?

आडिडासने त्यांच्या सांबा या स्नीकर ब्रांडचं वर्णन खास इतिहास असलेला बूट असं केलं आहे. मात्र ऋषी सुनक यांनी हे शूज घातल्याने त्यांच्यावर टीकेचा भडीमार होतो आहे. ऋषी सुनक यांनी ट्रेंडी दिसण्यासाठी शूज घातले आहेत, मात्र त्यांनी त्यांचं नुकसान करुन घेतलं आहे असंही काही युजर्सनी म्हटलं आहे. दुसरीकडे सुनक यांच्यावर प्रचंड टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी याबाबत माफी मागितली आहे.

हे पण वाचा- “याला म्हणतात साधेपणा!” ब्रिटीश पंतप्रधानांच्या पत्नी असूनही रस्त्यावर पुस्तक खरेदी करताना दिसल्या अक्षता मूर्ती, Video Viral

ऋषी सुनक यांची दिलगिरी

सोशल मीडियावर ऋषी सुनक यांनी आडिडास ब्रांडचे सांबा शूज घालून त्यांचा प्रचार केल्याने त्यांना प्रचंड टीकेचा सामना करावा लागला. त्यानंतर ऋषी सुनक यांनी माफी मागितली आहे. मला आडिडास हा ब्रांड आवडतो, मात्र मी सांबा समुदायाची माफी मागतो. असं म्हणत ऋषी सुनक यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मला आडिडासचे बूट पहिल्यांदा माझ्या भावाने ख्रिसमसची भेट म्हणून दिले होते. त्यानंतर मला दुसरा ब्रांड आवडला नाही. मला हेच शूज आवडतात.

ऋषी सुनक यांनी हेदेखील स्पष्ट केलं आहे की माझ्याकडे असलेले हे शूज मी खरेदी केले आहेत. मी दीर्घ काळापासून आडिडास शूज वापरतो. मात्र मी सांबा समुदायाची माफी मागतो. असं सुनक यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

Story img Loader