भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची पत्नी व भाजपा आमदार रिवाबा जडेजा, भाजपा खासदार पुनम माडम आणि महापौर बीना कोठारी यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. या व्हिडीओत लायकीत राहा असं म्हणत शाब्दिक बाचाबाची झाली. आता स्वतः आमदार रिवाबा जडेजा यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या गुरुवारी (१७ ऑगस्ट) गुजरातमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ज्यांना काहीच कळत नाही असे अतिहुशार लोक चपला काढतात”

रिवाबा जडेजा म्हणाल्या, “पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही अशा कार्यक्रमांमध्ये चपला काढत नाहीत. मात्र, ज्यांना काहीच कळत नाही असे लोक अतिहुशार बनून चपला काढतात, असं खासदार पुनम माडम म्हणाल्या. यावेळी तेथे भाजपाचे पदाधिकारी महापौर बिना कोठारी असे सगळे होते. हा माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न होता. त्या शहिदांच्या कार्यक्रमात असं बोलल्या.”

हेही वाचा : VIDEO: “लायकीप्रमाणे राहा”, रवींद्र जडेजाची आमदार पत्नी आणि भाजपा खासदारात कडाक्याचं भांडण…

“आत्मसन्मानाचा मुद्दा असल्याने मी त्यांना बोलले”

“मी तेथे चपला काढून शहिदांना आदरांजली वाहिली. अशावेळी खासदार माडम यांनी मला चपला काढण्यावरून बोलणं पटलं नाही. त्यामुळे आत्मसन्मानाचा मुद्दा असल्याने मी त्यांना बोलले की, त्यांनी या कार्यक्रमात माझ्याबाबत जे वक्तव्य केलं ते बरोबर नाही,” असं मत रिवाबा जडेजा यांनी व्यक्त केलं.

नेमकं प्रकरण काय?

क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा यांनी सांगितल्यानुसार, शहिदांना श्रद्धांजली देताना खासदार पुनम माडम यांनी चप्पल घातलेली होती. जेव्हा रिवाबा श्रद्धांजली वाहण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांनी चप्पल काढली. यानंतर खासदार माडम यांनी रिवाबा यांनी दिखाऊपणासाठी चप्पल काढल्याची शेरेबाजी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rivaba ravindra jadeja first comment over dispute with bjp mp in gujrat pbs
Show comments