पाटणा : अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने ‘विश्वासघात’ केल्याने त्यांच्याशी असलेले संबंध नितीशकुमार यांनी तोडल्यास बिहारमध्ये नवी आघाडी होऊ शकते, असे संकेत शनिवारी राष्ट्रीय जनता दलाने (राजद) दिले. तथापि, चेंडू आता जदयूच्या कोर्टात आहे, भाजपने जुना हिशोब चुकता केला आहे याची जाणीव नितीशकुमार यांना होणे गरजेचे आहे, असे राजदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी म्हटले आहे. आपला भाजपबद्दल आक्षेप नाही तर नरेंद्र मोदींबद्दल आहे, (तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते) असे नितीशकुमार यांनी म्हटले होते. या गोष्टीबद्दल नितीशकुमार यांना माफ करतील अशी व्यक्ती मोदी नाहीत, असेही तिवारी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा