बिहारमध्ये लोकजनशक्ती पक्ष आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या सहकार्याने लढवणार आहे. याबाबतची घोषणा लोकजनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांनी केली. जागावाटपाची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय जनता दलाशी मतभेदाचा त्यांनी इन्कार केला. लालूप्रसाद यादव की नितीश कुमार यांच्या बरोबर जायचे यावरून लोकजनशक्ती पक्षात दोन मतप्रवाह होते हे त्यांनी मान्य केले. आमची तीन पक्षांची युती भाजपला जोरदार टक्कर देईल, असा दावा त्यांनी केला. पासवान यांनी आघाडीबाबत बुधवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या वेळी दहा जागा लढण्याची आपली इच्छा असल्याचे पासवान यांनी या भेटीत स्पष्ट केले होते. आता राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पासवान यांनी स्पष्ट केले.
पासवान यांची काँग्रेस, राजदशी आघाडी
बिहारमध्ये लोकजनशक्ती पक्ष आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या सहकार्याने लढवणार आहे. याबाबतची घोषणा लोकजनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांनी केली.
First published on: 31-01-2014 at 02:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rjd ljp cong alliance final in bihar ram vilas paswan