बिहारमध्ये लोकजनशक्ती पक्ष आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या सहकार्याने लढवणार आहे. याबाबतची घोषणा लोकजनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांनी केली. जागावाटपाची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय जनता दलाशी मतभेदाचा त्यांनी इन्कार केला. लालूप्रसाद यादव की नितीश कुमार यांच्या बरोबर जायचे यावरून लोकजनशक्ती पक्षात दोन मतप्रवाह होते हे त्यांनी मान्य केले. आमची तीन पक्षांची युती भाजपला जोरदार टक्कर देईल, असा दावा त्यांनी केला. पासवान यांनी आघाडीबाबत बुधवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या वेळी दहा जागा लढण्याची आपली इच्छा असल्याचे पासवान यांनी या भेटीत स्पष्ट केले होते. आता राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पासवान यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा