शामली जिल्ह्यातील १७५ मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. सध्या सुरु असलेल्या पवित्र रमझानच्या महिन्यांतही मुस्लिम जनता घरांमधून बाहेर पडत मतदान करीत आहेत, हेच भाजपाला अपेक्षित नव्हते. त्यामुळे येथील मतदान थांबवून त्यांना मतदानापासून रोखण्याचा भाजपाचा डाव असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवार तबस्सूम हसन यांनी केला आहे. त्याचबरोबर मतदान यंत्रांच्या बिघाडाबाबत त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून तक्रारही दाखल केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rld candidate tabassum hasan accuses bjp of tampering with evms writes to ec