पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहिताचे भव्य स्वप्न पाहिले आहे आणि ते साकार करण्यासाठी लागणारी हिंमतदेखील त्यांच्याकडे आहे, असे उदगार ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक गोएंका यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे काढले.
देशातील पत्रकारितेच्या क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या स्वर्गीय रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी राजधानीतील ‘आयटीसी मौर्य’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका दिमाखदार समारंभात झाले. इंडियन एक्स्प्रेस समूहाचे संस्थापक आणि निडर पत्रकारितेचे प्रतीक असलेले स्वर्गीय रामनाथ गोएंका यांच्या स्मरणार्थ दरवर्षी देशभरातील सर्वोत्कृष्ट वार्तांकनांचा सन्मान करण्यात येतो. यंदा त्याचे अकरावे वर्ष होते.
पुरस्कार सोहळ्यात केलेल्या स्वागतपर भाषणामध्ये विवेक गोएंका म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची पुनर्स्थापना केली आहे. देशवासियांपर्यंत सरकारने कशा पद्धतीने पोहोचले पाहिजे, याची व्याख्याच पंतप्रधानांनी बदलली आहे. त्यामुळेच या सोहळ्यासाठी पंतप्रधानांनी उपस्थित असणे याला एक वेगळे महत्त्व आहे. जेव्हा या सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती करण्यासाठी मी त्यांना भेटलो. त्यावेळी आम्हा दोघांमध्ये विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यावेळीच मोदी यांनी देशहिताचे भव्य स्वप्न पाहिले असल्याचे माझ्या लक्षात आले आणि ते साकार करण्यासाठी लागणारी हिंमतदेखील त्यांच्याकडे आहे, हे सुद्धा मला जाणवले, असे विवेक गोएंका यांनी सांगितले.
शोध पत्रकारिता, संशोधन, अभ्यास या सर्वांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर लिखाण केलेल्या पत्रकारांचा गौरव या सोहळ्यामध्ये करण्यात येणार आहे. आपल्या लेखणीमधून या पुरस्कारार्थी पत्रकारांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले आहेत. त्यांच्या प्रश्नांचा गौरवच यानिमित्ताने करण्यात येतो आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्यांसोबतच पुढील काळात व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणणाऱ्यांचाही सन्मान ‘रामनाथ गोएंका मेमोरिअल फाऊंडेशन’कडून करण्यात येईल. त्यासाठी लवकरच ‘रामनाथ गोएंका चेंजमेकर पुरस्कार’ही देण्यात येतील. जिल्ह्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने आणि विकासाभिमूख काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा या माध्यमातून गौरव करण्यात येईल, असे विवेक गोएंका यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सोहळ्यामध्ये एक्स्प्रेस समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी मोदी यांना विशेष फोटोफ्रेम भेट दिली. मोदी यांच्या शपथविधीच्या दिवशीच्या इंडियन एक्स्प्रेसच्या पहिल्या पानाची ती फोटोफ्रेम आहे. राजकारण, समाजकारण, आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातील नामवंत मंडळी आवर्जून या सोहळ्यासाठी उपस्थित होती.

या सोहळ्यामध्ये एक्स्प्रेस समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी मोदी यांना विशेष फोटोफ्रेम भेट दिली. मोदी यांच्या शपथविधीच्या दिवशीच्या इंडियन एक्स्प्रेसच्या पहिल्या पानाची ती फोटोफ्रेम आहे. राजकारण, समाजकारण, आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातील नामवंत मंडळी आवर्जून या सोहळ्यासाठी उपस्थित होती.