Ramesh Bidhuri on Priyanka Gandhi in Delhi Elections 2025 : महाराष्ट्रातील निवडणुका मार्गी लागल्यानंतर आता दिल्लीत विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. भाजपाने काल उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तर, दुसरीकडे काँग्रेस आणि आप दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, प्रचारसभांना वेग आला असून आरोप प्रत्यारोप अन् टीका टिप्पण्यांनाही उत आलाय. आता भाजपाचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी प्रियांका गांधींचा उल्लेख करत अत्यंत वादग्रस्त टिप्पणी केली आहे. त्यांच्या या टिप्पणीवर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मी निवडून आलो तर प्रियांका गांधींच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते बनवेन”, असं भाजपा उमेदवार रमेश बिधुरी म्हणाले. बिधुरी हे आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार आहे. त्यांच्याविरोधात दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि काँग्रेसच्या अलका लांबा यांचा सामना आहे.

हेही वाचा >> मणिपूर अस्थिरतेत भाजपचे हितसंबंध! काँग्रेस अध्यक्षांचे पंतप्रधानांवर शरसंधान

दरम्यान, इंडिया टुडेशी बोलताना रमेश बिधुरी म्ङणाले, आज जर या विधानाने काँग्रेसची मने दुखावली असतील तर हेमा मालिनी यांचं काय? त्या एक प्रसिद्ध नायिका राहिल्या आहेत. त्यांनी भारतीय चित्रपटांनी भारताचा गौरव केला आहे. परंतु, लालूप्रसाद यादव यांनी बिहारचे रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे गुळगुळीत करू असं म्हटलं होतं. जर लालूंचे विधान चुकीचे असेल तर माझेही विधान चुकीचे असेल, असं रमेश बिधुरी म्हणाले.

काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर

भाजपाला महिलाविरोधी पक्ष संबोधून काँग्रेसने म्हटलंय की बिधुरी यांनी केलेलं वक्तव्य लज्जास्पद आहे. महिलांच्या बाबतीत त्यांची कुरूप मानसिकता दिसते. हाच भाजपाचा खरा चेहरा आहे, असं काँगेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते म्हणाल्या. त्यांनी रमेश बिधुरी आणि संपूर्ण भाजपाने प्रियांका गांधींची माफी मागावी, अशीही मागणी केली आहे.

आपचे संजय सिंह यांनीही भाजपावर केली टीका

E

बिधुरी यांच्या या वक्तव्यावर आम आदमी पक्षाकडून राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनीही ट्वीट केलंय. ते म्हणाले, हा भाजपाचा उमेदवार आहे. त्यांची भाषा ऐका. हा भाजपाच्या महिलांचा सन्मान आहे. अशा नेत्यांच्या हातात दिल्लीतील महिलांचा सन्मान सुरक्षित राहील का?

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roads like priyanka gandhis cheeks bjp leaders sexist jibe sgk