देशात कोठेही फिरताना मोबाईलवर बोलण्यासाठी येत्या ऑक्टोबरपासून वेगळे रोमिंग शुल्क द्यावे लागणार नाही. केंद्रीय दूरसंचार आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय दूरसंचार धोरणानुसार रोमिंग शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी येत्या ऑक्टोबरपासून होईल, असे त्यांनी सांगितले.
सिब्बल म्हणाले, रोमिंग शुल्क नेमके कोणत्या दिवसापासून माफ होईल, हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र, ऑक्टोबरमध्येच रोमिंग शुल्क माफीची अंमलबजावणी करण्यात येईल, हे नक्की.
रोमिंग रद्द झाल्यानंतर मोबाईलधारकांना एका राज्यातून किंवा विभागातून दुसऱया राज्यात किंवा विभागात गेल्यावर इनकमिंग कॉल्स मोफत असतील तसेच ऑऊटगोईंग कॉल्सही स्थानिक दरांनुसार करता येतील. राष्ट्रीय दूरसंचार धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मे २०१२ मध्येच मंजुरी दिली आहे. त्यामध्ये एक देश, एक दर धोरणाला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसारच देशातील रोमिंग शुल्क माफ कऱण्यात येईल.
येत्या ऑक्टोबरपासून देशभर रोमिंग फ्री!
देशात कोठेही फिरताना मोबाईलवर बोलण्यासाठी येत्या ऑक्टोबरपासून वेगळे रोमिंग शुल्क द्यावे लागणार नाही. केंद्रीय दूरसंचार आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी ही माहिती दिली.
First published on: 04-03-2013 at 10:46 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roaming charges could be history by oct 2013 says kapil sibal