लवचिक, परिधेय संवेदकांमुळेआता यंत्रमानवांना त्वचेचं कोंदणही लाभणार आहे. आरोग्य तपासणी करणाऱ्या यंत्रमानवांसाठी ते विशेष महत्त्वाचे असेल. इलेक्ट्रॉनिक त्वचेशी संबंधित तंत्रज्ञान आतापर्यंत बरेच विकसित झाले आहे. फक्त या तंत्रज्ञानाची किंमत कमी करणे आवश्यक आहे. चीनच्या वैज्ञानिकांनी आता नवी पारदर्शक स्मार्ट त्वचा तयार केली असून ती उत्पादनास स्वस्त तर आहेच शिवाय त्या त्वचेच्या माध्यमातून यंत्रमानवाच्या हालचालीतून निर्माण होणारी यांत्रिक ऊर्जा साचवता येते. संशोधकांच्या मते यापूर्वी त्वचेची संवेदनशीलता वाढवण्याचे प्रयत्न झाले आहेत. ही इलेक्ट्रॉनिक त्वचा असते व त्यातून इलेक्ट्रोडची संख्या वाढवता येते, पण त्यामुळे ती त्वचा खर्चिक बनते. काही स्मार्ट त्वचांना बाहेरून ऊर्जा पुरवावी लागते व त्यामुळे जास्तीत जास्त वायरींचे जंजाळ तयार होते. पेपर स्कीन तंत्रज्ञानात क्षमता भरपूर आहेत, पण पारदर्शकता नसल्याने परिधेय वायरींचा समावेश करताना अडचणी येतात. आताची त्वचा ही अतिशय पातळ प्लास्टिकची बनवली असून संशोधकांच्या मते ती १.९ मि.मी. इतक्या पातळीवर  असून त्यातील चांदीच्या चार नॅनो वायर इलेक्ट्रोडमुळे संवेदशनशीलता येते. यात एक कंपोनंट (इलेक्ट्रॉनिक भाग) असा आहे की, तो नॅनोजनरेटर कार या विस्कॉनसिन मॅडिसनने तयार केलेल्या मोटारीप्रमाणेच घर्षणातून विद्युतभार तयार करतो. ट्रायबोइलेक्ट्रिक इफेक्टने यात यंत्रमानव इतर वस्तूंच्या संपर्कात येतो तेव्हा निर्माण होणारी घर्षणातील ऊर्जा शोषली जाते. आपण केसातून कंगवा फिरवतो तेव्हा अशी ऊर्जा तयार होत असते. त्यामुळे या प्रकारची ऊर्जा स्पर्शपडदे व कपडे यातूनही विद्युतभाराच्या रूपात मिळत असते. कृत्रिम बोटांच्या हालचालीतूनही ती तयार होते. त्यामुळे बाहेरील बॅटरी म्हणजे विजेरीची गरज लागत नाही. नवीन स्मार्ट त्वचा तयार करणाऱ्यांच्या मते आंतरक्रियेचा बिंदू व बल ओळखणे आवश्यक असते. जेव्हा मधमाशी फिरत असते तेव्हा ते फुलाजवळ जाते व पुन्हा मागे येते तेव्हा अशी ऊर्जा तयार होत असते. हा विद्युतभार स्थिर असतो व स्मार्ट त्वचेला असे ऊर्जेचे ३० हजार वळसे दिले तर ती चांगले काम करते. हे तंत्रज्ञान यंत्रमानवांना कृत्रिम त्वचा किफायतशीर किमतीत उपलब्ध करून देईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा