पुण्यातील मुळा-मुठा नद्यांच्या शुद्धीकरणासाठी ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी’सोबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने बुधवारी करार केला. या अंतर्गत या दोन्ही नद्यांच्या स्वच्छतेसाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य जपानकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कर्ज स्वरूपात हा निधी भारताला मिळणार असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘ट्विटर’च्या माध्यमातून सांगितले.
Japan Govt has committed to provide 19.064 bn yen (about Rs1000 Cr) soft loan for Mula-Mutha River cleaning project. pic.twitter.com/Eeip2ayrHb
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) January 13, 2016
पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा या भीमेच्या उपनद्या आहेत. या दोन्ही नद्यांमध्ये विविध ठिकाणी सोडण्यात येणारे सांडपाणी आणि इतर कचऱ्यामुळे दोन्ही नद्या प्रदूषित झाल्या आहेत. त्यामुळे या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी जपानसोबत करण्यात आलेला करार महत्त्वाचा ठरणार आहे. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी या कराराचे स्वागत केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रकाश जावडेकर यांचे आभार मानले आहेत. २०२२ पर्यंत यासाठी पुण्यामध्ये सहा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कर्जाची परतफेड केंद्र सरकारकडूनच करण्यात येणार आहे.