आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी रुशिकोंडा येथील टेकडीवर एक महाल तयार करत आहेत. हा राजमहाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या राजमहालाचं बांधकाम सुरु आहे. हा महाल विशाखापट्टणम येथील विजाग येथील एका टेकडीवर तयार केला जातो आहे. त्यानंतर आता टीडीपीने हा दावा केला आहे की हा महाल व्यक्तिगत वापरासाठी तयार केला जातो आहे. त्यानंतर हा महाल चर्चेत आला आहे.

टीडीपीचा आरोप काय?

जगन मोहन रेड्डी आंध्र प्रदेशची निवडणूक हरल्यानंतर आता टीडीपीने आरोप केला आहे की टूरिझम प्रोजेक्टच्या आडून व्यक्तिगत वापरासाठी रेड्डी राजमहाल बनवत आहेत. रुशिकोंडा हिल्सवर हे बांधकाम करत असताना पर्यावरणाचे नियम पाळले जात नाहीत. अनेक नियम डावलून हे बांधकाम करण्यात येतं आहे. नियम डावलून ५०० कोटी रुपये खर्च करुन हा राजमहाल उभारला जातो आहे असाही आरोप होतो आहे.

हे पण वाचा- आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणच्या कुटुंबात आहेत एकापेक्षा एक दिग्गज सुपरस्टार, पाहा संपूर्ण फॅमिली ट्री

वादात का अडकला आहे रुशिकोंडा हिलवरचा हा महाल ?

मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी रुशिकोंडा हिलवर तयार होणाऱ्या या महालाचा अहवाल मागवला आहे. तसंच टीडीपीने या शाही महालाचे फोटोही पोस्ट केले आहेत आणि हा आरोप केला आहे की जगन मोहन रेड्डी हे आता निवडणूक हरल्यानंतर त्या राजमहालात राहण्यासाठी जाणार आहेत. पब्लिक फंड मधून तयार करण्यात आलेला महाल ते व्यक्तिगत वापरासाठी करणार आहेत असा आरोप टीडीपीने केला आहे. आता याबाबत जगनमोहन रेड्डी काही उत्तर देणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

रुशिकोंडा येथे उभारला जातोय भव्य प्रकल्प

टीडीपीचे आमदार आणि माजी मंत्री गंता श्रीनिवास यांनी रुशिकोंडा येथील टेकड्यांचा दौरा केला. त्यानंतर या ठिकाणी जे बांधकाम केलं जातं आहे त्याचे फोटो पोस्ट केले होते. २०२१ मध्ये वायएसआरसीपी च्या सरकारने ही घोषणा केली होती की आंध्र प्रदेश पर्यटन विभागातर्फेत हरिथा रिसॉर्टचा आम्ही पुनर्विकास करणार आणि या ठिकाणी पर्यटकांसाठी चांगलं पर्यटन स्थळ उभारणार. मात्र या ठिकाणी एक राजमहालच उभा राहतो आहे. सुरुवातीला या ठिकाणी ३५६ कोटी रुपये खर्च करुन हे क्षेत्र विविध भागांमध्ये विभागलं गेलं. त्यानंतर या ठिकाणी इमारती उभ्या राहू लागल्या. टीडीपीने या प्रकल्पाला तेव्हाही विरोध केला होता आणि आत्ताही विरोध केला आहे. या प्रकल्पाच्या आड जगन मोहन रेड्डी हे त्यांच्या व्यक्तिगत वापरासाठी हा महाल उभारत आहेत.