प्रवचन देणा-या आसाराम बापूंनी मध्यप्रदेशात ७०० कोटी रूपये किमतीच्या जमीनीवर डल्ला मारला आहे. ‘एसएफआईओ’ने त्यांच्याविरोधात पुर्नतपास करण्याची मागणी केली आहे. रतलाम मध्ये २०० एकर जमीनसंबंधी एका खटल्यामध्ये ‘एसएफआईओ’ला वाटते की आसाराम बापू आणि त्यांच्या मुलाविरूध्द भारतीय दंड संहिता आणि कंपनी कायदा १९५६ प्रमाणे खटला चालायला हवा.
कॉर्पोरेट प्रकरणातील मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले, ‘‘आसाराम बापू, त्यांचा मुलगा नारायण साई आणि काही अन्य लोकांवर खटला चालवण्यासाठी आम्हाला ‘एसएफआई’ओ कडून अहवाल प्राप्त झाला आहे.
सूत्रांनी सांगितले की दिल्ली…पुणे फ्राइट कोरीडोरवर असलेली ही जमीन जयंत विटामिन्स लिमिटेडची आहे आणि याचा २००० मध्ये ताबा घेऊन त्याचा वापर करत आहेत.
जयंत विटामिन्स लिमिटेडची एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे ज्याला २००४ मध्ये मुंबई शेअर बाजाराच्या यादीतून काढून टाकण्यात आले होते.
कंपनी दुस-या फार्मा कंपन्यांच्या ग्लूकोज आणि विटामिनच्या उत्पादनांसाठी अग्रणी कंपनी मानली जाते.
जेवीएलने या प्रकरणात कोणतीही तक्रार केलेली नाही. मात्र, एका शेअर धारकाने मंत्रालयाशी संपर्क साधला ज्याने याबाबतीतली चौकशी २०१० मध्ये ‘एसएफआईओ’ला करण्यास सांगितली होती. ‘एसएफआईओ’ने दोन वर्षांपर्यंत याप्रकरणाची तपासणी करून मंत्रालयाला आपला अहवाल पाठवला आहे.

Story img Loader