राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा हैदराबादच्या नामांतरणाचा मुद्दा उपस्थित केलाय. नामांतरणाचा मुद्दा लक्षात घेत संघाने जानेवारी महिन्यामध्ये तीन दिवसीय बैठक हैदराबादमध्ये आयोजित केलीय. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात होणाऱ्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून संघाशी संबंधित संस्थाना आमंत्रित करण्यात आलं आहे. पुढील वर्षी म्हणजेच २०२२ रोजी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या तयारीसंदर्भातील चर्चा या बैठकीत केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या बैठकीची माहिती देताना आयोजन हैदराबादऐवजी भाग्यानगरमध्ये करण्यात आल्याचं संघानं म्हटलंय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये हैदराबादऐवजी भाग्यानगर असं शहराचं नाव लिहिण्यात आलंय. “आरएसएसशी संबंधित वेगवेगळ्या संस्थांच्या प्रमुखांची समन्वय बैठक ५ ते ७ जानेवारी २०२२ दरम्यान भाग्यानगरमध्ये आयोजित करण्यात आलीय,” असं सुनील आंबेकर यांनी सांगितल्याचं ट्विट आरएससच्या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे.

Municipal Corporation Election, Pimpri Chinchwad ,
पिंपरी चिंचवड : “महानगरपालिकेत २०१७ ची पुनरावृत्ती होणार”, शंकर जगताप काय म्हणाले?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
pm Narendra modi loksatta news
PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलीस सज्ज
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
Sanjay Raut On Mumbai Municipal elections 2025
Sanjay Raut : महाविकास आघाडीत फूट? “काय होईल ते होईल, आम्ही सर्व महापालिका स्वबळावर लढवणार”, ठाकरे गटाची मोठी घोषणा
Ramsar Conservation Court Public Interest Litigation filed by High Court
रामसर संवर्धन न्यायालयाकडे; उच्च न्यायालयाकडून जनहित याचिका दाखल
Mumbai governor loksatta news
राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण: निर्णय न घेण्याची राज्यपालांची भूमिका खेदजनक, उच्च न्यायालयाची टिप्पणी
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : महाविकास आघाडी तुटणार? संजय शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘शरद पवारांचा गट लवकरच सत्तेत…’

आता केवळ हैदराबादच्या नामांतरणाची मागणी करण्याऐवजी संघाने थेट भाग्यानगर असा उल्लेख करत हे नाव वापरण्यास सुरुवात केल्याने या ट्विटची चांगलीच चर्चा आहे. मागील बऱ्याच काळापासून संघ आणि भाजपाकडून हैदराबादच्या नामांतरणाचा मुद्दा उपस्थित केला जातोय.

२०२० साली झालेल्या हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान फैजाबादचं नामांकरण करुन त्याला अयोध्या नाव दिलं जाऊ शकतं आणि अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं जाऊ शकतं तर हैदराबादचंही नामांकरण करुन त्याला भाग्यानगर करता येईल, असं म्हटलेलं.

“काही लोकांनी मला हैदराबादचं नामांकरण करुन त्याला भाग्यानगर करता येईल का असं विचारलं. त्यावर मी का नाही? नक्कीच! असं उत्तर दिलं. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर आम्ही फैजाबादचं अयोध्या केलं आणि अलहाबादचं प्रयागराज केलं. तर मग हैदराबादचं भाग्यानगर का करता येणार नाही?,” असं योगी म्हणाले होते.

“सरसंघचालक मोहन भागवत, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पक्षाचे राष्ट्रीय सचीव बी. एल. संतोष आणि सहाय्यक सचीव शिव प्रकाश यांच्यासहीत अनेक वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत,” अशी माहिती सुत्रांनी दिलीय. पुढील वर्षभरामध्ये पक्षाचा कार्यक्रम कसा असेल याबद्दलची माहिती पक्षाचे पदाधिकारी संघाला देतील असंही सांगण्यात आलंय.

उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड, गोवा या पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकींच्या तयारींसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे.

Story img Loader