पीटीआय, नवी दिल्ली

हिंदूंवरील अत्याचार त्वरित रोखा आणि हिंदू समाजाचे आध्यात्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांची तत्काळ तुरुंगातून मुक्तता करावी, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेशातील हंगामी सरकारला केले आहे.

prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
Haryana BJP chief Mohan Lal Badoli and Jai Bhagwan
Mohan Lal Badoli: भाजपाच्या नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल; पीडित तरुणीने सांगितली अत्याचाराची आपबिती
West Bengal vs Odisha on tigers
West Bengal vs Odisha on Tigers : वाघांच्या मुद्द्यावर पश्चिम बंगाल विरुद्ध ओडिशा संघर्ष… यापूर्वीही प्राण्यांवरून जगभरात झालेत वाद
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
This is nation of Hindus their interests come first says Nitesh Rane
हे हिंदूंचे राष्ट्र, त्यांचे हित प्रथम – नितेश राणे

बांगलादेशात हिंदू, महिला आणि अन्य सर्व अल्पसंख्याकांवर इस्लामी कट्टरपंथीयांद्वारे करण्यात आलेले हल्ले, हत्या, लूटपाट, जाळपोळ आणि अमानवीय अत्याचारांच्या घटना चिंताजनक आहेत. या घटना रोखण्याऐवजी बांगलादेशातील विद्यामान सरकार आणि अन्य तपास यंत्रणा मूकदर्शक झाल्या आहेत, अशी टीकादेखील होसाबळे यांनी बांगलादेशमधील हंगामी सरकारवर केली.

हेही वाचा >>>VIDEO : दिल्लीत अरविंद केजरीवालांवर हल्ला! आपचे मंत्री म्हणाले, “अंगावर स्पिरीट फेकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न”

यासोबतच भारत सरकारने बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांच्या समर्थनार्थ जागतिक जनमत तयार करण्यासाठी भारत सरकारने ‘लवकरात लवकर’ पावले उचलावीत, असे आवाहनही होसाबळे यांनी केले. २६ नोव्हेंबर रोजी न्यायालय परिसरात झालेल्या हिंसाचारात वकिलाची हत्या झाली होती. या हत्येनंतर दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

कोलकात्यातील रुग्णालयाचा बांगलादेशी रुग्णांवर उपचारास नकार

बांगलादेशात हिंदूंविरोधातील हिंसाचाराच्या घटना आणि इस्कॉनचे चिन्मय दास यांच्या अटकेविरोधात कोलकातातील जेएन रे रुग्णालयाने बांगलादेशी रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला आहे. बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होत असलेले अत्याचार आणि आपल्या राष्टध्वजाच्या अपमानाच्या विरोधात हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सुभ्रांशू भक्त या रुग्णालयाच्या अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा >>>भारतीय तिरंग्याचा अवमान; कोलकातामधील रुग्णालयाने घेतला मोठा निर्णय, यापुढे बांगलादेशी रुग्णांवर उपचार करणार नाही

बांगलादेशातील हिंदूंवर अन्याय आणि अत्याचाराचे नवे पर्व उदयास येत असल्याचे दिसते, जेणेकरून त्यांचा स्वसंरक्षणासाठी लोकशाही मार्गाने उठलेला आवाज दडपला जाऊ शकतो. शांततापूर्ण आंदोलनांत हिंदूंचे नेतृत्व करणारे इस्कॉनचे आध्यात्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांना तुरुंगात डांबणे अन्यायकारक आहे.- दत्तात्रेय होसाबळेसरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

मोहंमद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी सरकारने ‘नरसंहार’ रोखण्यासाठी पावले उचलावीत व हिंदू समाजाला सुरक्षेची हमी द्यावी. अशा घटनांमुळे हिंदू समुदायामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे आणि बांगलादेशच्या प्रतिमेवर गंभीर परिणाम होत आहे.-करण सिंहवरिष्ठ नेते, काँग्रेस

Story img Loader