राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी राजांचं उदाहरण देत निवडणुकांबाबत सूचक विधान केलं. “राजा चुकला तर त्याचं फळ निवडणुकीत मिळतं,” असं मत भागवत यांनी व्यक्त केलं. तसेच आपला समाज निसर्ग आणि परंपरेबाबत राजावर अवलंबून नसतो, असंही नमूद केलं. ते वाराणसीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहन भागवत म्हणाले, आपला समाज निसर्ग आणि परंपरेबाबत राजावर अवलंबून नसतो. राजाचं काम असतं आणि तो ते काम करत असतो. राजाने त्याचं काम व्यवस्थित करावं हे समाजाला पहावा लागतं. लोकशाहीत जसं काम चालतं तसं. आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि ते देश चालवतात.”

“राजा चुकला, तर त्याचं फळ निवडणुकीत मिळतं”

“आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं काम पाहतो, झोपत नाही. आपण हे लोकप्रतिनिधी काय करतात आणि काय नाही हे पाहत नाहीत. जे चांगलं काम करतात त्याचं फळ त्यांना मिळतं आणि जर राजा चुकला, तर त्याचंही फळ त्यांना निवडणुकीत मिळतं,” असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : जागतिकीकरणाच्या थैमानाला उत्तर देणारा भारत निर्माण करायचा आहे; सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांचे मत

“भारतात प्राचीन काळात बळी दिला जायचा”

“परंपरा चालत आली आहे. त्यात खूप थोड्या गोष्टी आहेत ज्या वेळेनुसार बदलतात. ज्या गोष्टी बदलतात त्या बदलल्याच पाहिजे. भारतात प्राचीन काळात बळी दिला जायचा. आज जीवांचा बळी देत नाहीत. परंपरेची आठवण म्हणून लिंबू कापतात किंवा नारळ फोडतात. कारण बळी देण्यासाठी केली जाणारी हिंसा कालसुसंगत नाही, असं लक्षात आलं. त्यावेळी आपण वर्तन बदललं. वेळेनुसार बदलाव्या लागतात अशा खूप थोड्या गोष्टी आहेत. परंतु खूप साऱ्या गोष्टींमागे आपलं अध्यात्मिक विज्ञान आहे,” असंही भागवत यांनी नमूद केलं.