आई म्हणजे मुलं जन्माला घालणारी फॅक्टरी नाही, असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वादग्रस्त वक्तव्ये कारणाऱया हिंदुत्त्ववादी नेत्यांना फटकारले आहे. कानपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी संघाची भूमिका स्पष्ट करणारे वक्तव्य केले.
हिंदूंनीच केवळ दोन मुले जन्माला घालायची का?
भागवत म्हणाले, किती मुलांना जन्म द्यायचा, हा प्रत्येक दाम्पत्याचा प्रश्न आहे. मात्र, आई म्हणजे मुलं जन्माला घालणारी फॅक्टरी नाही. कोणी काय बोलावे, यावर संघ नियंत्रण ठेवू शकत नाही. मात्र, यासंदर्भात प्रत्यकाने जबाबदारीने आपले विचार मांडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शंकराचार्य यांचे वादग्रस्त वक्तव्य, हिंदूंना १० अपत्यांचा मंत्र
प्रत्येक हिंदूने चार मुलांना जन्म द्यावा, असे वक्तव्य भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले होते. त्याचबरोबर इतरही हिदुत्त्ववादी नेत्यांनी अशाच पद्धतीने मुल जन्माला घालण्यासंदर्भात आणि घरवापसीबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून केंद्रातील भाजप सरकारवर टीका करण्यात येत होती. या सर्व पार्श्वभूमीवर भागवत यांनी अशा प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यांना संघाचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे.