राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली असून त्यांना आता औद्योगिक सुरक्षा दलाचे कमांडो संरक्षण देतील.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीआयएसएफचे जवान रा.स्व.संघाच्या नागपूर येथे मुख्यालयात तसेच ते जिथे जातील तिथे त्यांच्यासमवेत असतील. भागवत यांना धमक्या देण्यात आल्या असून त्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. सध्या त्यांना महाराष्ट्र पोलिसांचे संरक्षण आहे. नव्या व्हीव्हीआयपी संरक्षणानुसार त्यांना ६० कमांडो चोवीस तास सुरक्षा पुरवतील. या पथकाकडे एके रायफली व इतर साधनसामुग्री असेल. त्यांच्या वाहनांची व निवासस्थानाची सुरक्षा बदलण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यास मान्यता दिली असून भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह काही राजकीय नेत्यांना यापूर्वी अशीच सुरक्षा देण्यात आली आहे.
आणखी वाचा