राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याहस्ते सोमवारी दोन पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. ‘भारत का मुसलमान’ व ‘मेरे पापा परमवीर’ ही ती दोन पुस्तकं असून १९६५ सालच्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवलेले शहीद अब्दुल हमीद यांच्या जीवनावर ही पुस्तकं आधारित आहेत. सोमवारी उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधील हमीद यांचं मूळ गाव धामूपूरमध्ये ते बोलत होते. या पुस्तक प्रकाशनावेळी मोहन भागवत यांनी भारतातील सामाजिक सौहार्दावर आणि चीन व पाकिस्तानच्या आगळिकीवरही भाष्य केलं.

काय म्हणाले मोहन भागवत?

या कार्यक्रमाला मोहन भागवत यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी भारतातील विविधतेवर भाष्य केलं. “भारतात मोठ्या प्रमाणावर विविधता आहे. पण तरीदेखील भारत एक राष्ट्र आणि एक समाज म्हणून अस्तित्व टिकवून आहे. आपल्याकडे वेगवेगळे धर्म, जाती, समाज आणि राज्य आहेत. आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो. पण एक देश म्हणून आपण सगळे एक आहोत”, असं मोहन भागवत यावेळी म्हणाले.

kartik aaryan on his dating life
कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Meenakshi Seshadri
“चित्रपटाच्या करारावर सही…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ गोष्टीमुळे कोसळले होते रडू; मीनाक्षी शेषाद्री आठवण सांगत म्हणाली, “त्यामुळे मी रडत…”
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!
Kartik Aaryan
“एक वेळ अशी होती की…”, कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील आठवण; म्हणाला…
Neelam Kothari
“ती खूप घाबरली…”, समीर सोनीने सांगितला पत्नी नीलम कोठारीचा किस्सा; म्हणाला, “तुम्ही विशीत असताना…”

मोहन भागवत यांचा सरकारला सल्ला, “वर्षभरापासून मणिपूर जळतं आहे, त्याकडे…”

पाकिस्तान व चीनशी झालेल्या युद्धांचा उल्लेख करताना मोहन भागवत म्हमाले, “आपल्या शत्रूराष्ट्रांशी झालेल्या युद्धादरम्यान भारतातील सर्व जातीचे, धर्माचे आणि राज्यांचे लोक आपल्या देशासाठी एक झाल्याचं आपण पाहिलं आहे”.

अब्दुल हमीद यांना मरणोत्तर परमवीर चक्र

भाषणाच्या आधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी अब्दुल हमीद व त्यांच्या दिवंगत पत्नी रसूलन बीबी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली दिली. १९६५ साली झालेल्या युद्धादरम्यान अब्दुल हमीद यांनी गाजवलेल्या शौर्याप्रीत्यर्थ त्यांना मरणोत्तर परमवीर चक्राने गौरवण्यात आलं.

“निवडणुकीत राजकीय पक्षांनी शिष्टाचार पाळला नाही, खरा सेवक…”, RSS प्रमुख मोहन भागवतांचं थेट विधान!

‘मेरे पापा परमवीर’ हे पुस्तक रामचंद्रन श्रीनिवासन यांनी लिहिलं असून ‘भारत का मुसलमान’ हे पुस्तक निवृत्त कॅप्टन मकसूद गाझीपुरी यांनी लिहिलं आहे.

मोहन भागवत-योगी आदित्यनाथ यांच्या भेटीची चर्चा!

काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली. यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. उत्तर प्रदेशमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळाली. यानंतर लोकसभा निवडणुकांमधील पक्षाच्या कामगिरीवर भाजपामध्ये सविस्तर चर्चा व विचारमंथन झाल्याचं सांगितलं जात आहे.