राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत मशिदीला भेट देत मुस्लीम नेत्यांची भेट घेतली. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. मोहन भागवत यांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे उमर अहमद इलयासी यांची भेट घेतली. बंद दाराआडची ही बैठक जळवपास एक तास चालली.

या भेटीबाबत बोलताना उमर इलयासी यांचा मुलगा सुहैब इलयासी यांनी सांगितलं, “या भेटीने देशभरात एक चांगला संदेश गेला आहे. आम्ही एका कुटुंबाप्रमाणे चर्चा केली. आमच्या निमंत्रणानंतर ते भेटीसाठी आले.”

Swami Govinddev Giri on Vote Jihad
‘निवडणुकीची तुलना धर्म युद्धाशी नको’, व्होट जिहादच्या मुद्द्यावर स्वामी गोविंददेव गिरींनी व्यक्त केलं परखड मत
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ajit Pawar Sabha Mohol, Ajit Pawar news,
अजित पवारांकडून करमाळ्यात आमदार संजय शिंदे यांचा प्रचार, महायुती धर्माला कोलदांडा
Ashish Shelar on Vote Jihad
Vote Jihad: “एक ऐसा व्होट जिहाद…”, सज्जाद नोमानी यांच्या विधानाचा व्हिडीओ शेअर करत आशिष शेलारांची मविआवर टीका
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…
shankar prasad allegation on congress
ओबीसींचे हक्क मुस्लीमांना देण्याचा घाट; रविशंकर प्रसाद यांचा काँग्रेसवर आरोप
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल

मोहन भागवत यांनी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील या मशिदीला भेट दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीचे अनेक अर्थ काढत तर्क वितर्क लावले जात आहेत.

या भेटीवर सरसंघचालक देशातील धार्मिक सौहार्द वाढवण्यासाठी मुस्लीम बुद्धीजीवींना भेटत असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सांगण्यात येत आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर म्हणाले, “सरसंघचालक मोहन भागवत अनेक लोकांना भेटत आहेत. हा सातत्यापूर्ण ‘संवाद’ प्रक्रियेचा भाग आहे.”

हेही वाचा : विश्लेषण : RSS चा गणवेश आणि खाकी हाफ पँट; काँग्रेसच्या ट्वीटनंतर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरु, नेमका काय आहे इतिहास?

मोहन भागवत यांनी २२ ऑगस्ट रोजी पाच मुस्लीम बुद्धीजीवींची भेट घेतली होती. तसेच सध्या देशातील बिघडलेलं धार्मिक सौहार्द यावर काळजी व्यक्त केली होती. या भेटीतही देशातील धार्मिक सौहार्द वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर दिल्याचं सांगण्यात आलं होतं.